आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी विकासासाठी संतुलित पर्यावरणवादी दृष्टिकोनच तारेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या झालेल्या घसरणीने भारतीय अर्थव्यवस्था तर रासायनिक प्रक्रिया करून बाजारात विकल्या जात असलेल्या उपलब्ध दूध, फळांसह अन्न पदार्थांमुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. मानवाच्या संतुलित विकासासाठी पर्यावरणवादी दृष्टिकोनच योग्य पर्याय ठरणार असल्याचे मत अखिल भारतीय काँग्रेसचे चिटणीस अनिस अहेमद यांनी व्यक्त केले.

सुशील सोशल फोरमच्या वतीने मंगळवारी सायंकाळी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थनी महापौर अलका राठोड होत्या. या वेळी व्यासपीठावर आमदार दिलीप माने, शहराध्यक्ष धर्मा भोसले, माजी आमदार निर्मला ठोकळ, सभागृह नेते महेश कोठे, सुधीर खरटमल, डॉ. र्शीकांत येळेगावकर, बाळकृष्ण रेणके, हणमंतू सायबोळू आदी उपस्थित होते. फोरमचे अध्यक्ष अँड. यू. एन. बेरिया यांनी प्रास्ताविक केले. अनिस अहेमद यांच्या हस्ते ‘दिव्य मराठी’चे सल्लागार संपादक व अर्थविषयक अभ्यासक यमाजी मालकर, डॉ. र्शीनिवास खांदेवाले, प्रा. प्रज्ञा पवार यांना अकरा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल देऊन सुशीलकुमार शिंदे पुरस्काराने गौरवण्यात आले.

यानंतर महापौर अलका राठोड, आमदार दिलीप माने, महेश कोठे यांनी मनोगत व्यक्त केले. रशिदा शेख यांनी सूत्रसंचालन केले. महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुमन जाधव यांनी आभार मानले.

देशाची अर्थव्यवस्था बिकट
अर्थविषयक अभ्यासक यमाजी मालकर म्हणाले, आज देशाची अर्थव्यवस्था बिकट बनत चालली आहे. एकाच दिवशी 700 ने सेन्सेक्स घसरतो तर 700 रुपयांनी सोन्याचे दर वाढतात, असे चढ-उतार कशामुळे होतात, याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी आर्थिक साक्षरता येणे गरजेचे असल्याचेही मालकर यांनी स्पष्ट केले.

यमाजी मालकर, डॉ. खांदेवाले व पवार यांना पुरस्कार प्रदान
सुशील सोशल फोरमच्या वतीने ‘दिव्य मराठी’चे सल्लागार संपादक यमाजी मालकर, डॉ. र्शीनिवास खांदेवाले, प्रा. प्रज्ञा पवार यांना काँग्रेसचे चिटणीस अनिस अहेमद यांच्या हस्ते सुशीलकुमार शिंदे पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी महापौर अलका राठोड, अँड. यू. एन. बेरिया, डॉ. र्शीकांत येळेगावकर, धर्मा भोसले, आमदार दिलीप माने, सुधीर खरटमल.

सर्वांना समान संधी
सामान्य माणसासाठी आर्थिक प्रणाली राबवली जाते, पण भविष्यकाळात विकासालाही र्मयादा येणार आहेत. निसर्गाशी होत असलेली मानवी छेडछाड. भविष्यकाळात पर्यावरण व समान संधी असलेला समाजवादी दृष्टिकोन हाच मानवी विकासाला पूरक ठरणार असल्याचे मत डॉ. र्शीनिवास खांदेवाले यांनी स्पष्ट केले.

विवेकाचा जागर
प्रा. प्रज्ञा पवार यांनी हा पुरस्कार संपूर्ण आंबेडकरी चळवळीचा असल्याचे सांगून विवेकवादाचा जागर ज्यांनी गतिमान ठेवला, त्यासाठी आपल्या प्राणाची किंमत चुकवणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोलकरांना हा पुरस्कार मी अर्पित करते असे सांगितले.