आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘काँग्रेस कार्यकर्त्यांनी पराभवामुळे खचू नये’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - नुकत्याच चार राज्यांत झालेल्या निवडणुकींमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. या पराभवामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी खचून न जाता जोमाने काम करून केंद्रात काँग्रेसची सत्ता आणावी, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त कॉँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहाण समारंभाप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी आमदार प्रणिती शिंदे, आमदार दिलीप माने, काँग्रेस सेवादलचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा, माजी मंत्री आनंदराव देवकते, सिद्धाराम म्हेत्रे, शहराध्यक्ष धर्मा भोसले, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, महापौर अलका राठोड, प्रकाश यलगुलवार, सुधीर खरटमल, निर्मलाताई ठोकळ, धनाजी साठे, राजशेखर शिवदारे, नगरसेवक आरिफ शेख, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष तौफिक श्ेाख, हेमू चंदेले, आदित्य दायमा आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते.

राहुल गांधींची पंचसूत्री भ्रष्टाचाराला रोखणारी
लोकपाल बनवताना खासदार राहुल गांधी यांनी जी तत्त्वे सांगितली, ती भ्रष्टाचार रोखणारी आहेत. त्यांचे स्वागतच केले पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे शनिवारी येथे म्हणाले.

सोलापूर र्शमिक पत्रकार संघाच्या वतीने हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँम्फी थिएटरमध्ये पुरस्कारांचे वितरण झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘कुठल्याही वादळाला काँग्रेस घाबरत नाही. या पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले. वादळे झेलली. शेवटी राजकारणात अशा घटना घडतच असतात.’

‘एटीएस’चा अहवाल आला, पाहून सांगतो!
मध्य प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने सोलापुरात केलेल्या कारवाईचा अहवाल गृहमंत्रालयाला आला का? या प्रश्नावर शिंदे म्हणाले, ‘आलाय. परंतु अजून पाहिले नाही. पाहिल्यानंतर नेमके सांगता येईल.’