आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushil Kumar Shinde News In Marathi, I Will Try To Get Water From Ujani Dam, Divya Marathi

पाच पाळ्यांत उजनीतून पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपुरात संत विद्यापीठाच्या निर्मितीसाठी येत्या काळात निश्चित प्रयत्न करू. तसेच उजनीच्या पाण्याच्या पाच पाळ्या मिळाव्यात, यासाठीही मुख्यमंत्र्यांना त्वरित सूचना करू. वेळ पडल्यास खास बैठकही बोलावू, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. काँग्रेसच्या वतीने रविवारी येथे आयोजित कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते.
गेल्या 40 वर्षांपासून आपण राजकारणात सक्रिय असल्याचे सांगून गृहमंत्री शिंदे म्हणाले, ‘जनतेने अडचणींच्या काळातही मला भरघोस मताधिक्यांनी निवडून दिले. अनेकदा सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढवली. पक्ष, पक्ष नेतृत्वावरील निष्ठा आणि लोकांचा आशीर्वाद यामुळे राज्यात मंत्री, मुख्यमंत्री, आंध्रप्रदेशचे राज्यपाल व आता केंद्रात गृहमंत्रिपदी पोहोचू शकलो. मात्र, यापुढे उमेदवारी मिळेल अथवा न मिळेल. परंतु पक्षाचा आदेश पाळू.’ प्रास्ताविकात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी शिंदेंनी केलेल्या कामांचा आढावा मांडला. अध्यक्षस्थानी आमदार भारत भालके हे होते. त्यांच्यासह सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनीही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे, विष्णूपंत कोठे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, विश्वनाथ चाकोते, प्रकाश पाटील, नगराध्यक्षा उज्ज्वला भालेराव, उपनगराध्यक्ष सुधीर धोत्रे, साधना उगले, सुनेत्रा पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष नागेश गंगेकर, वामन माने, राजूबापू पाटील, इंदुमती अलगोंडा, अविनाश शिंदे, शिवाजी काळुंगे, दिलीप देवकुळे आदी उपस्थित होते.
पदापेक्षा पक्षनिष्ठा आहे महत्त्वाची
‘अडचणीच्या काळात पक्षाने मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. ती योग्यरीत्या पार पाडली. त्यामुळे राज्यात पुन्हा सत्ता आली. मात्र, पक्षर्शेष्ठींनी मुख्यमंत्रिपद न देता आंध्रच्या राज्यपलपदी नियुक्ती केली. त्यामुळे मी नाराज झालो नाही. पक्षर्शेष्ठींनी पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात संधी दिली. केंद्रात पंतप्रधानानंतरचे सर्वात महत्त्वाचे गृहमंत्रिपद मिळाले. पदे येतात, जातात. मात्र, पक्षावरची निष्ठा ही महत्त्वाची असते.’ असे शिंदे म्हणाले.