आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushil rasik Building Construction Is Illegal Solapur

‘सुशील-रसिक’चे बांधकाम बेकायदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - महापालिकेकडून घेतलेल्या खुल्या जागेत 10 टक्क्यांपेक्षा जास्त बांधकाम करता येत नाही. मात्र, सुशील-रसिक सभागृहाने ही मर्यादा ओलांडल्याचे गुरुवारी झालेल्या मोजणीत प्राथमिक टप्प्यात स्पष्ट झाले आहे. नेमके जादा बांधकाम किती झाले आहे, याची माहिती मिळू शकली नाही.

सभागृहाचे बांधकाम बेकायदा असल्याची तक्रार आल्याने महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी याविषयी अहवाल मागवला आहे. महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी सुशील- रसिक सभागृह आणि पसिरसराची मोजणी केली. दोन तास चाललेल्या मोजणीचे चित्रीकरणही करण्यात आले. शुक्रवारी त्याचा अहवला आयुक्तांना देण्यात येणार आहे.

मुरारजी पेठेत केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्ती, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विष्णुपंत कोठे यांच्यासह भगवान गणपतराव कोठे, दत्तात्रय गणपतराव कोठे, सरस्वती सुरेश कोठे यांच्या मालकीच्या जागेत सभागृहाचे बांधकाम आहे. ते करताना नियमांचा भंग करण्यात आला आहे. प्रमाणापेक्षा जास्त बांधकाम केले. त्यास राजकीय दबाव आणून बांधकाम आणि वापर परवाना मिळवलेला आहे. हे बेकायदा बांधकाम पाडावे, अशी तक्रार भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीने गुडेवार यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत गुडेवार यांनी मोजदाद करण्याचे आदेश दिले होते.

सुशील-रसिक सभागृहाची फाइल मागवली. त्या इमारतीची मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करू.’’ चंद्रकांत गुडेवार, आयुक्त

विषय काय? आक्षेप काय?
मुरारजी पेठेत शहर नियोजन योजना नं. 2 फायनल फ्लॉट 3ची खुली जागा आहे. ती परिसरातील सार्वजनिक उपक्रमांसाठी होती. कोठे यांनी 1987 मध्ये खरेदी केली. तेथे बांधकाम करताना राघवेंद्र नगरमधील नागरिकांची सहमती घेतली नाही. चार हजार 444 चौरस मीटर जागा आहे. 10 टक्के म्हणजे 444 चौरस मीटर बांधकाम करता येते. उरलेली जागा खुली ठेवायची असते. कोठे यांना 29 जुलै 1994 रोजी बांधकाम परवाना देण्यात आला. तळघरात 427 तर तळमजला 444 चौ. मी. अशी 871 चौ. मी. बांधकाम परवानगी तत्कालीन नगर अभियंता मोहन औरंगाबादकर यांनी दिली. वापर परवाना नगर रचना विभागाचे साठे यांनी दिला. जागेचा वापर नफा व वैयक्तिक उत्पन्नासाठी करता येत नाही, अशी अट आहे. मात्र, त्यासाठी त्याचा वापर सुरू आहे. खुली जागा जागा बँकेत गहाण ठेवून कर्ज काढले. ते बांधकाम बेकायदा असल्याचे असल्याचे समितीचे अँड. गोविंद पाटील याचे म्हणणे आहे.

फाइल महापालिकेत सापडत नाही. आमचे बांधकाम नियमानुसार आहे. महापालिकेने मोजणी केली असेल तर करू द्या. आमचे म्हणणे मांडू. आयुक्तांची कोणीतरी दिशाभूल करत आहे.’’ महेश विष्णुपंत कोठे, सभागृह नेते

प्राथमिक तपासणीनुसार जास्त बांधकाम आढळले आहे. खुल्या जागेत 10 टक्क्यांपेक्षा जास्त बांधकाम असेल तर ते पाडावे लागेल. शुक्रवारी अहवाल देणार आहे.’’ आर. डी. जाधव, उपअभियंता, बांधकाम परवानगी विभाग, महापालिका

..तर अण्णा हजारेंना आणू
आयुक्त गुडेवारांची बदली किंवा त्यांच्या कायदेशीर कामांत अडचण निर्माण केल्यास थेट समाजसेवक अण्णा हजारे यांना सोलापुरात आणून आंदोलन करण्याचा इशारा समितीचे अँड. गोविंद पाटील यांनी दिला.

यांनी केली मोजणी
उपअभियंता आर. डी. जाधव, अभियंता व्ही. बी. जोशी, एन. एन. बाबर, इर्शाद जरतार, प्रकाश सावंत यांनी सुशील- रसिक सभागृहाची पाहणी केली.

सावस्करांचा प्रतिकूल अभिप्राय
बांधकाम परवाना सादर झाल्यानंतर तत्कालीन अभियंता सुभाष सावस्कर यांनी प्रतिकूल अभिप्राय दिला होता. खुल्या जागेत बांधकाम करताना ले-आउटमधील सर्व सभासदांच्या सह्या गरजेच्या असल्याचे त्यांनी म्हटले होते.