आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushil Rasik Building Construction Is Illegal Solapur

‘सुशील रसिक’च्या मोजणीचा अहवाल आयुक्तांना सादर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मुरारजी पेठेतील सुशील रसिक सभागृहाच्या मोजणीचा अहवाल बांधकाम परवाना विभागाचे उपअभियंता आर. डी. जाधव यांनी शुक्रवारी सायंकाळी आयुक्तांना दिला. तो गोपनीय स्वरूपाचा असून त्यावर अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी दिली. सभागृहाचे बांधकाम बेकायदा असल्याची तक्रार आल्याने र्शी. गुडेवार यांनी अहवाल मागितला होता. सुशील रसिक सभागृह इमारत आरक्षण असलेल्या खुल्या जागेत असून, तेथे 10 टक्क्यांपेक्षा जास्त बांधकाम असल्याची तक्रार भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समितीचे अँड. गोविंद पाटील यांनी आयुक्तांकडे केली. त्यानुसार जागेची मोजणी करण्यात आली. खुली जागा घेतल्यानंतर त्यावर 10 टक्क्यांपेक्षा जास्त बांधकाम करता येत नाही.