आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिर बांधणे ही भाजपची पोकळ घोषणा : शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आयोध्येत राम मंदिर बांधण्याची चर्चा 15 वर्षांपासून सुरूच आहे. राम मंदिर बांधणे ही भाजपची पोकळ घोषणा आहे, असा टोला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी लगावला. भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी अमित शहा यांच्या ‘राम मंदिर’ प्रतिक्रियेवर ते बोलत होते.

शिंदे शनिवार, रविवार असे दोन दिवस सोलापूर दौर्‍यावर आहेत. डॉ.गुरुनाथ परळे यांच्या ‘सहृदय’ पुस्तक प्रकाशन समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिंदे म्हणाले, निवडणुका जवळ आल्यानंतर राम मंदिर बांधू अशी घोषणा गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते. परंतु त्यांची त्यासंदर्भात तशी हालचाल नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा वक्तव्याकडे लोक दुर्लक्षच करतात.अन्न सुरक्षा कायद्याचा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. सार्वजनिक वितरण यंत्रणेतील भ्रष्टाचार व मक्तेदारांना अटकाव करण्यासाठी सर्वप्रकारची काळजी घेऊनच याची अंमलबजावणी केली जाणार आहे. देशातील जवळपास 81 कोटी लोकांच्या जगण्याचा हक्क म्हणून अन्न सुरक्षा कायद्याकडे पाहिले जाते. लोकाभिमुख योजना म्हणून सोनिया गांधी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे, असे शिंदे म्हणाले.

दोषी असेन तर..
मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीबाबत प्रवीण वाटेगावकर यांनी पुन्हा याचिका दाखल केली आहे. यावर शिंदे म्हणाले, न्यायालयास न्यायदानाचा अधिकार आहे. दोषी असेन तर मला न्यायालय दोषी ठरवेल.