आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde Come Back To Home After Hospitalization

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुफ्फुसावरील शस्त्रक्रियेनंतर सुशीलकुमार शिंदे रुग्णालयातून घरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - फुफ्फुसावरील छोटाशा शस्त्रक्रियेनंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून रविवारी सकाळी पालीहिल बांद्रा येथील घरी परतले. डॉक्टरांनी आणखी काही दिवस विर्शांतीचा सल्ला दिला असून, लवकरच ते गृहमंत्रालयाचा कारभार पाहणे पुन्हा सुरू करतील, अशी माहिती त्यांची कन्या व आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.


दि. 4 ऑगस्ट रोजी शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ते ब्रीच कँडी रुग्णालयातील चौथ्या मजल्यावरील आयसीयूत होते. पाच दिवसांनंतर त्यांना आयसीयूतून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर रविवारी सकाळी 11 वाजता ते रुग्णालयातून घरी परतले. मुंबईतील पालीहिल बांद्रा येथील निवासस्थानी ते विर्शांतीसाठी थांबणार आहेत. लवकरच ते गृहमंत्रालयाचा कारभार पाहणे सुरू करतील, असे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.