आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदेंची भेट बंगल्यावर नव्हे; डाकबंगल्यावर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मध्य प्रदेशातील ‘एटीएस’ पथकाकडून अचानक झालेल्या कारवाईनंतर सोलापूरचे पोलिस सक्रिय झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ केली आहे. शिंदे भेट देणार असलेल्या ठिकाणांची पाहणी पोलिसांनी केली. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आज सोलापुरात येणार आहेत.

डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, नवी पेठ, सात रस्ता, जुळे सोलापूर, टिळक चौक आदी परिसरांतील कार्यक्रम स्थळांना भेटी दिल्या. मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा जाणार्‍या मार्गावर सराव केला. काही ठिकाणी शुक्रवारपासूनच बंदोबस्त लावला आहे. गेल्या आठवड्यात शिंदे सोलापुरात होते तेव्हा फारसा बंदोबस्त दिसत नव्हता. ते नागरिकांना घरीही भेटू शकत होते. आता शिंदे यांना शासकीय विर्शामगृह येथेच भेटता येणार आहे.

दरम्यान, मंगळवारी झालेल्या एटीस कारवाईत विनाकारण गोवले जात असल्याचा आरोप अटक केलेल्या संशयीत आरोपींच्या कुटुंबीयांनी केला आहे, तर एटीएसकडून या संदर्भातील अधिकृत स्पष्टीकरण न दिल्याने हा विषय चर्चेत राहिला आहे.

आर. आर. पाटील यांचा दौरा
राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील खासगी हेलिकॉप्टरने तासगावहून मंगळवेढा येथे येत आहेत. राजाराम जगताप यांच्या निवासस्थानी भेट देतील. तेथून 11.30 वाजता मनोहर सपाटे यांच्या घरी भेट देतील. दुपारी 12.45 वाजता शासकीय विर्शामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक होईल. दीडला पोलिस आयुक्तालयात अधिकार्‍यांसमवेत आढावा बैठक आहे. दुपारी तीन वाजता हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील.

सुरक्षेसाठी बदल
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे शनिवार व रविवार सोलापुरात आहेत. नागरिकांना आपले निवेदन द्यायचे अथवा अन्य कामांसाठी भेटायचे असेल तर शासकीय विर्शामगृहात भेटावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या कारणावरून हा बदल करण्यात आला आहे.’’ प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त, सोलापूर

वाहतुकीत बदल
शनिवारी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान दोन तास अगोदर वाहतूक मार्ग बंद असतील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. सकाळी आठपासून सरस्वती चौक ते लकी चौक किल्लाबाग हा मार्ग बंद राहील. प्रभात टॉकीजपासून सरळ सर्व वाहने चार पुतळ्याकडे ये-जा करतील. काँग्रेस भवनसमोरील रस्ता सकाळी सात ते दहा बंद राहील. जुळे सोलापुरातील डीमार्टजवळ मार्ग दुपारी दोन ते सायंकाळी पाचपर्यंत बंद राहील. गोविंदर्शी मंगल कार्यलय, म्हाडा कॉलनीजवळील रस्ता वापरण्याचे आवाहन साहाय्यक पोलिस आयुक्त मोरेश्वर आत्राम यांनी केले आहे.