आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde Jumped On Railway Land Encroachment Issue

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे जागेच्या अतिक्रमण प्रश्नात सुशीलकुमार शिंदे यांचीही उडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - मीटरगेजरेल्वेचे रूळ काढल्यानंतर त्या जागेवर दुसरा प्रकल्प तातडीने सुरू करण्याबाबत मी स्वत: रेल्वे विभागाला कळवले होते. पण, रेल्वे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे त्या जागेवर नागरी वसाहत वाढली. त्या लोकांकडे तेथील रहिवासी पत्र, कराच्या पावत्या आहेत. त्या जागेवर रेल्वेला प्रकल्प उभा करावयाचा असल्यास आधी त्या लोकांचे पुनर्वसन करावे लागेल, अशी भूमिका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली.

मीटरगेजवर झालेल्या अतिक्रमण प्रकरणी रेल्वे प्रशासन नागरिकांमधील संघर्ष चांगलाच पेटला आहे. काँग्रेस भवनमध्ये आयोजिलेल्या पत्रकार परिषदेत शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांची पाठराखण केली. मीटरगेजचे रूळ काढल्यानंतर महापालिकेनेही ती मोकळी जागा तलावाच्या बाजूने चालण्याचा व्यायाम करण्यासाठी (वॉकिंग ट्रॅक) मागितली होती. त्याकडेही रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळेच हळूहळू तेथे लोकांची वसाहत वाढली. रेल्वेच्या दुर्लक्षामुळेच ती समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नवीन प्रकल्प उभारण्यापूर्वी त्या लोकांचे पुनर्वसन झालेच पाहिजे, ही भूमिका आमची आहे.

शिंदे यांनी केला हल्लाबोल
एनटीपीसीसाठीचाकोळसा ओरिसातून येणार असून तो होटगी मार्गे येणार आहे. मीटरगेजच्या जागेवरून एनटीपीसाठी कोणताही रेल्वे मार्ग जाणार नाही. राहूल यांच्याकडे नेतृत्व आणि कर्तृत्व आहे. अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावे. सोनिया गांधी लवकरच योग्य तो निर्णय घेतील.
दिल्लीच्या निवडणुकीत भाजप आप यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. दोघांच्या भांडणात काँग्रेसला संधी मिळेल. मोदी यांच्या सरकारला नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. पण, त्यांनी एकही ठोस विकास धोरण राबवले नाही. राज्यात फडणवीस सरकारला १०० दिवस झाले. शेतक-यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, एलबीटाचा तिढा सुटला नाही.

माझाफॅक्स बंद
पत्रकारांनीशिंदे यांना स्थानिक राजकारणासंबंधी अनेक प्रश्न विचारले. पक्षातून बाहेर गेलेले अनेकजण पुन्हा पक्षात येत आहेत. त्याचपद्धतीने कोणाची घरवापसी आहे का? पूर्वी पक्ष प्रवेशासाठी मुरारजी पेठेतील नेत्याच्या घरातून फॅक्स येत. आता त्यांचाच परतीचा फॅक्स आला का? असा प्रश्न पत्रकारांनी शिंदेंना विचारला. त्यावर शिंदे यांनी माझा फॅक्स बंद आहे, असे उत्तर देताच उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे उडाले.