आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपप्रचार झाल्यास मीडियाला ठेचू : शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘मीडियाने सत्य तेच दाखवावे. सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून विशिष्ट पद्धतीने अपप्रचार सुरू आहे. हे योग्य नाही. भविष्यात असा प्रकार झाला, तर इलेक्ट्रॉनिक मीडियाला आम्ही ठेचून काढू,’ असा इशारा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी दिला आहे.

सोलापूर लोकसभा युवक कॉँग्रेसच्या वतीने रविवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अपप्रचार करून इलेक्ट्रॉनिक मीडिया नागरिकांची दिशाभूल करत आहे. यातून विनाकारण बदनामीही होत आहे. अशा अपप्रचाराला जनता कधीच माफ करणार नाही. यावर नियंत्रण कसे ठेवायचे हे आता आम्हाला समजले आहे. इथून पुढे असे प्रकार झाले, तर त्याची अंतर्गतरीत्या तपासणी करून त्यांना ठेचून काढू, असे शब्द गृहमंत्र्यांनी वापरले. जेव्हा दाखवायचे असेल, तेव्हा कणखरपणा दाखवू. मी काही लेचापेचा गृहमंत्री नाही, अशा शब्दांत तेलंगणाबाबत झालेल्या गोंधळावेळी संसदमध्ये उत्तर दिले होते, असे शिंदे यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.