आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बरं झालं बाबा, डिपॉझिट जप्त झालं नाही, खुद्द कॉंग्रेसच्या माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची भावना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लोकसभा निवडणुकीत सोलापूर येथून मी हरणार हे जवळपास निश्चित होते. माझीच माणसे माझ्या विरोधात काम करीत होती. पण माझे नशिब चांगले, की माझे डिपॉझिट जप्त झाले नाही, अशी भावना दस्तुरखुद्द कॉंग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे. सुशीलकुमारांच्या या प्रांजळ वक्तव्याने कॉंग्रेसच्या केंद्रीय गृहमंत्र्यांची ही भावना तर इतर मंत्र्यांचा, खासदारांचा विचार न केलेलाच बरा, असे म्हणायची वेळ आली आहे.
सुशीलकुमार शिंदे अशा स्वरूपाची वादग्रस्त वक्तव्ये करण्यासाठी ओळखले जातात. प्रथम वक्तव्य करायचे आणि वाद झाला की सारवासारव करायची हे आता नित्याचेच झाले आहे. परंतु, अशा स्वरूपाच्या वक्तव्यांमधून ते त्यांच्या मनातील भावना कळत नकळत व्यक्त करतात.
सुशीलकुमार शिंदे यांची आज पत्रकार परिषद झाली. यावेळी ते म्हणाले, की माझ्याच लोकांकडून निवडणुकीत दगा होणार असल्याची कल्पना आधीच आली होती. त्यामुळे सर्व सूत्रे हाती घेऊन मी सोलापुरात ठाण मांडून बसलो होतो. पण व्हायचे तेच झाले. मला राजकारणातून निवृत्त व्हायचे होते. पण पक्षाने आदेश दिला. मी निवडणूक लढवली. हा माझा पराभव आहे. यात राहूल गांधी यांचा काहीही दोष नाही. मी हा पराभव स्वीकारतो. आता मी राजकारणात राहणार नाही. परंतु, पक्षाच्या माध्यमातून समाजसेवा करणार आहे.