आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde News In Marathi, Congress, Folks Artists, Divya Marathi

सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी उतरले लोककलावंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा विमुक्त भटक्या जाती, जमाती संघटनेतर्फे काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारार्थ सोमवारी रंगभवन सभागृहात प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शिंदेंचे आगमन होताच, हनुमान, राम-सीतेच्या वेषातील बहुरुप्यांनी त्यांचे स्वागत केले. पारधी, वडार, वैदू व डोंबारी समाजातील लोकांनी मेळाव्या सहभाग घेत प्रचार केला.
या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, महापौर अलका राठोड, ज्येष्ठ नेते विष्णूपंत कोठे, भटक्या विमुक्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले-पाटील, प्रांतिक अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, रामण्णा वैद्य, संजय गायकवाड, गोपाळ नंदूरकर, लक्ष्मण गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य उमाकांत राठोड आदी उपस्थित होते.
दहा वर्षांपूर्वी एनडीए सरकारची सत्ता असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना बदलण्याचा खटाटोप करून भटक्या विमुक्तांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला अशी टीका शिंदे यांनी मेळाव्यात बोलताना केली.
बहुरुप्यांनी केले स्वागत
या वेळी पुन्हा त्यांची सत्ता आल्यास ते लोक डॉ. बाबासाहेबांनी देशाला दिलेली समता, बंधूतेची शिकवण देणारी घटनाच बदलून टाकतील. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना स्वत:मध्ये सहभागी करून घेण्याची शक्यता काँग्रेसमध्ये आहे. सोलापूरमध्ये काहीच बदल झाला नाही, असे अनेकजण म्हणतात. पण, एखादे छोटे पत्र्याचे घर असणार्‍या सेटलमेंट भागात सध्या मोठय़ा टोलेजंग इमारती उभारल्या असून, हा बदलाचाच एक भाग आहे,’
राठोडांची नाराजी शिंदेंची गुगल
दारू, पैसे अन् बोकड दिल्यावर आपल्यालाच मतदान होईल, असा भ्रम कुणीही करून घेऊ नये, असे सांगत उमाकांत राठोड यांनी आपली नाराजी भाषणातून व्यक्त केली. त्यानंतर बोलताना शिंदे म्हणाले, उमाकांत मोठय़ा आवाजात बोलत असल्याने नाराजी दिसते. पण, या माणसात काँग्रेस भिनलेली आहे, त्यांची नाराजी दूर करू असे म्हणताच हास्याचे कारंजे फुलले.