आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde News In Marathi, Congress, Home Minister, Solapur

गृहमंत्री पित्याची भिस्त आमदार मुलीवर जास्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - लोकसभा निवडणुकीतील शहर मध्य (पूर्वीचा) दक्षिण सोलापूर हा मतदारसंघ नेहमी काँग्रेसच्या पाठीशीच राहिला आहे. पण यंदाच्या निवडणुकीत गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भिस्त मुलगी, आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर आहे. त्यामुळे पित्याला मुलीकडून किती मताधिक्य मिळते याची उत्सुकता लागून राहिली आहे.


प्रचाराच्या गेल्या 17 दिवसांत शहरात काँग्रेसने एकही मोठी सभा घेतली नाही, मोठय़ा नेत्याला वा सेलिब्रिटीला आणले नाही. स्वत: शिंदे ठाण मांडून आहेत, तर आमदार, कन्या प्रणिती शिंदे शहर मध्य मतदार संघ पिंजूृन काढीत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी त्यांच्या आई उज्ज्वलाताई शिंदे, भगिनी स्मृती, प्रीती तसेच राज र्शॉफ हे कुटुंब प्रचारात फिरताना दिसत होते. शिवाय नगरसेवक, पक्षाचे नेते यांची वेगवेगळी यंत्रणा आहेच. बहुभाषिक व बहुजातीय असे समीकरण असलेल्या शहरमध्य मतदार संघातील प्रचारात केवळ विकासाचेच मुद्दे राहिले आहेत.


नेते, सेलिब्रिटी आले नाहीत..
भाजपला शिवसेनेचीच साथ नाही
भारतीय जनता पक्षाला शिवसेनेची म्हणावी तशी साथ न मिळाल्याने शहरमध्य मधून मते मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागतेय असे चित्र आहे. मोदी यांच्या लाटेवर स्वार झालेले शरद बनसोडे युवकांची मते मिळतील या आशेवर आहेत. शिवाय, शिवसेना प्रत्यक्ष मतदानात नसली तरी त्यांना मानणारा वर्ग आपल्यालाच मतदान करेल असे भाजपला वाटते. एकूणच चित्र पाहता शहरमध्य मतदार संघातील राजकारण तर ढवळून निघाले आहे, आता मतदानाची उत्सुकता लागून राहिली आहे.


रूसवे - फुगवेही
आघाडीतील काही नेत्यांचे रूसवे-फुगवेही पाहायला मिळाले. आता प्रचाराचा एक दिवस राहिला आहे. त्यानंतर 17 तारखेला होणार्‍या मतदानातून प्रणिती शिंदे या आपल्या पित्याला किती मताधिक्य मिळवून देतात याची उत्सुकता लागून राहिली आहे. याकडे सार्‍यांचे लक्षही आहे.


‘आप’ फॅक्टर
आम आदमी पार्टीला शहर मध्यमधील काँग्रेसचे कट्टर विरोधक माकपचे नरसय्या आडम यांची साथ मिळाली आहे. पण, आडम यांचा निर्णयही उशिराच झाला. बाबर यांना आडम यांच्याकडून खुप अपेक्षा आहेत. त्यामुळे काँग्रेसची मते विभागली जातील का? याची चर्चा होते आहे.