आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde News In Marathi, Congress, Lok Sabha Election

सर्वधर्मसमभावाची आघाडीच सत्तेत येणार,सुशीलकुमार शिंदे यांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - आगामी लोकसभा निवडणूक ही धर्मांध शक्तीविरोधी असून सर्वधर्मसमभाव मानणारी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी येथे व्यक्त केला. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे मोठय़ा भावासारखे असल्याचे सांगत शिंदे यांनी पुन्हा पवारांवर स्तुतिसुमने उधळली.


कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची एकत्र बैठक कॉँग्रेस भवन येथे सायंकाळी झाली. तीत ते बोलत होते. श्री. शिंदे म्हणाले की, आम्ही (कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी) एकच आहोत. काहीवेळा आमचे मतभेदही झाले आणि आमच्या समतेच्या विचारांमुळे एकत्र आलो. मी शरद रावांचाच चेला, ते माझे मोठे बंधू आहेत. त्यासाठी ते कधी रागावले तरी मी कधी नाराज झालो नाही. कारण तेवढय़ाच प्रेमाने ते मला जवळ घेतात. आज राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे, याचा मला आनंद आहे.


एकाही मतावर परिणाम नाही
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे धर्मनिरपेक्ष विचारांचे पक्ष आहेत. म्हणून पूर्वीचे मतभेद बाजूला करून एका सतरंजीवर आले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्या एकाही मतावर राष्ट्रवादीकडून परिणाम होणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी दिली.

मुख्यमंत्री मंगळवारी सोलापुरात
कॉँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये काही मतभेद नाही.प्रत्येकाने जोमाने काम करणे आवश्यक आहे. दोन्ही पक्षांचे झेंडे घेऊन 25 मार्च रोजी मिरवणुकीत सहभागी होऊन एकतेचा संदेश द्या, असा सल्ला श्री. शिंदे यांनी दिला. 25 रोजी मुख्यमंत्रीसुद्धा येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोदी गुजरातच्या विकासाबाबत जे गवगवा करीत आहेत ते साफ चुकीचे आहे. गुजरातमध्ये आजही चारचार तास भारनियमन असते. रस्ते खराब आहेत. तेथील शेतकरीच सत्य मांडतील. कॉँग्रेस आघाडी सरकारने महाराष्ट्रात भरपूर विकास करून गेल्या दहा वर्षात चेहराच बदलला. आपण विकास केला मात्र मार्केटिंग करण्यास मागे पडलो, अशी खंत श्री. शिंदे यांनी व्यक्त केली.