आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde News In Marathi, Congress, Maratha Reservation, Divya Marathi

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, शिंदे यांचा पाठिंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या भूमिकेशी सहमत असल्याचे सांगून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. या मुद्दय़ावर सदैव मराठा समाजासोबत असल्याचे सांगत विधानसभा निवडणुकांपूर्वीच त्याबाबत निश्चितपणे सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले. काँग्रेसचे उमेदवार शिंदे यांच्या प्रचारासाठी रविवारी फडकुले सभागृहात मराठा समाजातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्या मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे सहभागी झाले होते.


विभानसभेला बहिष्कार टाकण्याचा इशारा
क्षत्रिय मराठा महासंघाचे अध्यक्ष दास शेळके म्हणाले, ‘मराठा समाजावर महापालिका व विधानसभा निवडणुकांमध्ये सातत्याने अन्याय झाला. समाजातील अनेकांनी आर्थिक स्थिती नाजूक असल्याने त्यांचे पाल्य उच्चशिक्षण घेऊ शकत नाहीत. काही विद्यार्थ्यांनी शुल्क भरता न आल्याने आत्महत्या केल्यात. बहुतांश मराठा समाज शेतीव्यवसायात आहे. त्यांना वेळेवर कर्ज न मिळणे, नैसर्गिक आपत्तीमुळे सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकून अनेकांनी आत्महत्या केल्यात. येत्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल.’
आमदार दिलीप माने म्हणाले, ‘मराठाला समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या भूमिकेवर मी ठाम आहे. येत्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याने बहिष्काराचा प्रश्नच येणार नाही.’
काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी प्रास्ताविकात समाजाच्या अडचणी व कार्याची माहिती देऊन सुशीलकुमार शिंदेंना विजयी करण्याचे आवाहन केले. माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल शिंदे आदी उपस्थित होते.


श्री. शिंदे म्हणाले..
माझ्या राजकीय वाटचालीमध्ये मराठा समाजाचे योगदान मोठे.
मराठा समाजाचा मलाच पाठिंबा गृहित धरून मी निर्धास्त.
नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल मिळाल्यानंतर तातडीने निर्णय
माजी आमदार (कै.) नामदेवराव जगताप यांनी माझे राजकीय भवितव्य घडवले.
(कै.) ब्रह्मदेव माने यांनी मला कडाडून विरोध केला. पण, माझ्या कार्याचे कौतुकही केले.