आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde News In Marathi, Congress, Modi, Gujarathi, Divya Marathi

गांधी कुटुंबाचा निष्‍ठावान असण्यात गैर ते काय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - होय, मी गांधी फॅमिलीचा लॉयलिस्ट आहे. चमचे हुए बिना कुछ नहीं होता, अशा अनोख्या शब्दांत केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी नरेंद्र मोदींच्या आरोपांना उत्तर दिले.
येथील जैन, राजस्थानी, गुजराती समाजातर्फे श्री. शिंदे यांच्या प्रचारार्थ महेश कॉलनीमध्ये गुरुवारी सायंकाळी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. उद्योगपती प्रेमरतन दमाणी, जयनारायण भुतडा, कॉंग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा मंचावर उपस्थित होते. दायमा आणि राजकुमार राठी यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
शिंदे म्हणाले, ‘‘2004 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मला राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. काही लोकांना माझी राजकीय कारकीर्द संपली म्हणून पेढे वाटले. त्यानंतर मला केंद्रीय ऊर्जामंत्रिपद दिले. गांधी परिवाराने माझ्यासारख्या सामान्य माणसाला खूप काही दिले. ‘हम जी हुजूर करने वाले है. ऊर्जामंत्री असताना गुजरात सरकारसोबत आमचे वाद झाले. गुजरात सरकार दारिद्रय़रेषेखालील लोकांना स्वस्तात वीज द्यायला तयार नव्हते. आम्ही त्यांना द्यायला भाग पाडले.’’
खूप डास होते, आता कमी झाले
शिंदे म्हणाले ‘‘आजवर 7 निवडणुका लढवल्या. ही आठवी निवडणूक आहे. जेव्हा-जेव्हा मी महेश कॉलनीमध्ये प्रचारासाठी यायचो त्यावेळी तुम्ही लोक येथे खूप डास आहेत, अशी तक्रार असायची. आता डास दिसत नाहीत. परिस्थिती बदलण्यासाठी थोडा वेळ लागतो.’’
गुजरात दंगलीचा संदर्भ देताना शिंदेही चुकले
शिंदेंनी मोदींचा समाचार घेताना गुजरात दंगलीचा चुकीचा उल्लेख केला. 2002 ऐवजी 1982 मध्ये दंगल झाल्याचे ते म्हणाले. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयींनी मोदींना राजधर्माची आठवण करून दिली होती. जो माणूस आपल्या नेत्याचे ऐकत नाही, तो गरिबांचे काय ऐकणार, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.
गुंडापासून वाचवा : भुतडा
जयनारायण भुतडा म्हणाले, आमच्या समाजातील सोमाणी नावाच्या तरुणाला एका गुंडाकडून धमक्या दिल्या जात आहेत. गुंडांचा बंदोबस्त करून समाजाला भयमुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली.