आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde News In Marathi, Congress, Narendra Modi, BJP, Divya Marathi

होय, मी एकनिष्ठ, मोदी खोटारडे; शिंदेंचे प्रत्युत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - ‘होय, गांधी परिवाराशी एकनिष्ठ राहिल्याने मला अनेक पदांवर काम करून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. पण आपण एकनिष्ठ नसल्याने काय इतिहास घडला, तो संपूर्ण देशाला माहीत आहे. तुमच्यातील किती ज्येष्ठ नेते बाजूला पडले. पदे मिळवण्यासाठी एकनिष्ठ असावेच लागते, असे सांगत स्वत:ला चहावाला म्हणवून सहानुभूती मिळवणारे मोदी धादांत खोटे बोलत आहेत,’ अशा शब्दात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नरेंद्र मोदींच्या सोलापुरातील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. शहर काँग्रेसच्या वतीने नीलमनगर येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
भाजपकडून विभाजनाचा प्रयत्न : आम्ही स्थिर सरकारच्या माध्यमातून सर्वधर्मसमभावाची ताकद जगाला दाखवून देत आहोत. मात्र विरोधक राम मंदिराच्या मुद्दय़ावरून देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 2002 मध्ये गोध्रा हत्याकांडामध्ये 100 जणांची हत्या करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी नरेंद्र मोदींना सत्ता सोडण्याचा आदेश दिला होता. मात्र त्यांनी तो धुडकावून लावला. जो व्यक्ती पक्षनेतृत्वाचे ऐकत नाही, तो देशातील जनतेचे काय ऐकणार? असा सवाल शिंदे यांनी केला.
मोदींची धूळफेक
मोदी गेली 10 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. पण चहा विकणारे मोदी असे कधीही ऐकण्यात वा चर्चेत नव्हते. पंतप्रधानपद मिळवण्यासाठी जनतेच्या डोळ्यात ते धूळफेक करीत आहेत. मी 40 वर्षांत 12 निवडणुका लढवल्या. प्रत्येक निवडणुकीत मी सोलापूरच्या कोर्टात पट्टेवाला असल्याचे सांगतो. गेली 10 वर्षे मुख्यमंत्री असताना मोदी एकदाही चहावाले असल्याचे कधीच समोर आले नाही. ते खोटी माहिती सांगून जनतेची फसवणूक करीत आहेत.