आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde News In Marathi, Congress, Narendra Modi, BJP, Solapur

चादरींनी पोलिसांचे गणवेश कसे होणार?,सुशीलकुमारांचे नरेंद्र मोदींना पुन्हा प्रत्युत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरच्या टेक्स्टाइल इंडस्ट्रीजमधून जेकॉर्ड चादरीचे उत्पादन होते. त्यापासून पोलिसांचे गणवेश कसे तयार होतील? उद्योग-व्यवसायाची माहिती न घेताच सभेत बिनबुडाचे आरोप करणार्‍यांच्या सुरतेत 4 लाख पॉवर लुम बंद आहेत. त्याबाबत मात्र ते मूग गिळून गप्प आहेत, अशा शब्दांत गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा प्रत्त्युत्तर दिले.
डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. होम मैदानावरील सभेत मोदींनी शिंदेंवर तोफ डागली होती. त्याचा समाचार गृहमंत्र्यांनी घेतला. माहिती न घेताच मोदींनी सभेत आरोप केले. याचा आगामी काळात समाचार घेऊ, असे सांगून त्यांनी आक्रमक इरादेच जाहीर केले.