आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde News In Marathi, Congress, Solapur Lok Sabha Constituncy

सुशीलकुमार शिंदेंच्या जनमत कौलाचा आलेख आणि त्याची उत्सुकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे चौथ्यांदा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी मतदार कौल अजमावत आहेत. चार तपांचा राजकीय अनुभव असलेल्या शिंदे यांच्यासाठी निवडणूक लढवण्याचा नि जिंकण्यासाठीचा सारीपाट मांडण्याचा दांडगा अनुभव आहे. यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मीडिया वॉरमध्ये सरळसरळ उतरल्याचा उघड आरोप झाला. या सर्व पाश्वर्भूमीवर त्यांना कौल कसा मिळणार, याची उत्सुकता आहेच. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत त्यांना मिळालेल्या जनमत कौलाचा आलेख चढ-उताराचा आहे.


1996 च्या निवडणुकीत सोलापूरची जागा भाजपने काँग्रेसकडून खेचून विजयश्री मिळवली होती. लिंगराज वल्याळ संसदेत पोहोचले होते. काँग्रेसने सर्वसाधारण मतदारसंघातून शिंदे यांना उभे केले. अर्थातच एकसंध काँग्रेस होती. त्यांनी 6 लाख 6,717 वैध मतांपैकी 3 लाख 36,346 इतकी मते मिळवली. जेमतेम 55.43 टक्के मते त्यांना मिळाली. 1 लाख 4 हजार मतांची त्यांनी लीड घेतली. भाजपचे लिंगराज वल्याळ यांना 2 लाख 31,974 मते मिळाली होती. काँग्रेसविरोधी मते 44.57 टक्के होते.


1999 च्या निवडणुकीत शिंदे यांना 6 लाख 6,446 मतांपैकी 2 लाख 86,578 मते मिळाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत 50 हजारांनी मताधिक्य घटले पण ते विजयी झाले. याचवेळी प्रतिस्पर्धी भाजपचे मताधिक्य 22 हजारांनी घटले. राष्ट्रवादीचे अब्दूलपूरकर यांना 1 लाख 2,803 मते मिळाली होती. राष्ट्रवादी पक्ष निर्मितीनंतरची ही लोकसभा निवडणूक होती. शिंदे यांच्या मतांचा कौल 56 टक्क्यांवरून 47.49 टक्क्यांवर घसरला होता.


जिल्ह्यातील पंढरपूर मतदारसंघ राखीव तर सोलापूर मतदारसंघावर शहरी व्यापार-उदीम वर्गातील लोकप्रतिनिधीत्व होते. भाजपने प्रतापसिंह मोहिते यांना 2003 च्या पोटनिवडणुकीत उतरवले. यानंतर 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सुभाष देशमुख उतरले.


या दोन्ही निवडणुकीत भाजपची मते सुमारे लाखाहून अधिक संख्येने वाढली. कृषिक संस्कृती असलेला मराठा व तत्सम जातवर्गाचा दोन्ही निवडणुकीत भाजपकडे कल दिसला. यानंतर मात्र सोलापूर मतदारसंघ आरक्षित झाला.
2009 च्या निवडणुकीत शिंदे यांच्याविरुद्ध भाजपने नवखे अँड. शरदकुमार बनसोडे यांना रिंगणात उतरवले. शिंदे यांना 3, 87,591 मते तर भाजपचे अँड. बनसोडे यांना 2 लाख 87,959 मते मिळाली. 1999 च्या निवडणुकीच्या तुलनेत शिंदे यांची मते लाखानी वाढली. परंतु मतांचा कौल जेमतेम 4 टक्क्यांनी म्हणजेच 47.49 वरून तो 52.15 टक्क्यांवर गेला.


यंदाची वैशिष्ट्ये
गृहमंत्री म्हणून शिंदे यांचा अतिरेक्यांना फासावर चढवण्यात रोल महत्त्वाचा राहिला. दिल्लीतील निर्भयाच्या घटनेनंतर कायदा दुरुस्ती. शरद पवार यांच्याशी जवळीकता केल्याने मराठा व तत्सम जातींवर राजकीय गणित अवलंबून. विकास निधीसाठीही प्रयत्न.

अँड. बनसोडे यांची ही दुसरी निवडणूक टर्म आहे. प्रचार यंत्रणा व नियोजनाचा नेमका अनुभव आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाचा उपयोग. ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी मतदान करण्याचे आव्हान. रामदास आठवले यांना राज्यसभेची संधी देऊन महायुतीत घेतल्याने दलित मतांची बेरीज घालण्याचा प्रयत्न ही वैशिष्ट्ये आहेत.