आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde News In Marathi, Nationalist Congress, Congress, Sharad Pawar

पवारांच्या आदेशाने मी रिंगणात, शिंदे यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना सांगितले गुपित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - आपण निवडणूक लढवणार नव्हतो. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या आदेशामुळेच मी लोकसभेची निवडणूक लढवत आहे, असे गुपित सोलापूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी कार्यकत्यांसमोर उलगडले.
शिंदे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी रात्री घोंगडे वस्ती येथील अथर्व गार्डनमध्ये झाला. या वेळी शिंदे बोलत होते.
शहराध्यक्ष महेश गादेकर, माजी आमदार नरसिंग मेंगजी, उपमहापौर हारून सय्यद, शंकर पाटील, लालसिंह रजपूत, काँग्रेसचे सभागृह नेते महेश कोठे, आनंद मुस्तारे, चंद्रकांत दायमा आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, ‘अलीकडच्या काळात बूथनिहाय काम करण्याची पद्धत बंद झाल्याचे दिसून येत होते. महेश गादेकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी वेगळेपण सिद्ध केल्याचे त्यांनी सांगितले.’
गादेकर म्हणाले, ‘मोदी हा भस्मासूर आहे. त्याचा उदय युवा पिढीला घातक ठरेल. बूथ कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करतील. आपल्या भागातून शिंदेंना मताधिक्य मिळवून देतील,’ असा विश्वास गादेकर यांनी व्यक्त केला.
या वेळी मेळाव्यावेळी नगरसेवक पीर अहमद शेख, इब्राहिम कुरेशी, बिस्मिल्ला शिकलगार, नीला खांडेकर, गीता मामड्याल, शांता दुधाळ, दीपक राजगे, भारत जाधव, महिला आघाडी अध्यक्ष अरुणा वर्मा, वैशाली गुंड, विनायक विटकर, राहुल इंदापुरे, प्रा. भोजराज पवार यांच्यासह सादिक कुरेशी, संजय जाबा, विशाल गायकवाड, विजयकुमार हत्तुरे आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.