आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sushilkumar Shinde News In Marathi, Sharad Pawar, Divya Marathi

पवारांशी संबंध चांगले, कार्यकर्त्यांत मतभेद नको - सुशीलकुमार शिंदे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - शरद पवार आणि माझे चांगले संबंध आहेत. दिल्लीमध्ये आम्ही एकत्रितपणे काम करतो. स्थानिक पातळीवर कार्यकर्ते मतभेद करतात, हे चुकीचे आहे. सर्व जातीधर्मांना एकत्र घेऊन जाणारी विचारधारा ही काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीने बाळगली आहे. म्हणूनच आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी केले.


पंढरपूर येथे पवारांच्या उपस्थितीत झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शिंदे बोलत होते. सत्ता सर्वसामान्यांंच्या हितासाठी वापरली पाहिजे. त्या भावनेनेच मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. शासनाकडून झालेल्या कामांची समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांनी येत्या महिनाभरात केले पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले. सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे तसेच माढ्यातील उमेदवार विजयसिंह मोहिते यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.


ही घडी अशीच राहू दे
एरवी एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून कुरघोड्या करणारी काँग्रेस व राष्ट्रवादीची मंडळी शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आली होती. त्यामुळे पालकमंत्री सोपल म्हणाले, ‘आज हे चित्र किती सुंदर दिसत आहे. या पुढील काळातदेखील ही घडी अशीच राहू दे.’