आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशीलकुमार शिंदे यांचा पुतळा जाळला; माकप, बसप रस्त्यावर, मात्र भाजप, कामगार संघटनेची चिडीचूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीविरोधात सोमवारी आंदोलने झाली. त्यात राजकीय पक्षांसह सामाजिक संस्थांचा सहभाग होता. बहुजन समाज पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सह्यांच्या मोहीम राबवली. चार पुतळा चौकात काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. या प्रकरणी बसप नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्यासह सुनीता भोसले, उषा शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. बदली रद्द न झाल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचेही चंदनशिवे यांनी सांगितले. सह्यांच्या मोहिमेत पहिली सही खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी केली. सुमारे पाच हजार नागरिकांनी दिवसभरात सह्या केल्या.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महापालिका प्रवेशद्वारासमोर धरणे दिले. सुशीलकुमार शिंदे यांनी बदली केल्याचा आरोप माजी आमदार नरसय्या आडम यांनी केला. याचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. सुमारे 500 कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सिद्धप्पा कलशेट्टी, नसिमा शेख, माशप्पा विटे आदी उपस्थित होते.

येणारे अधिकारी सक्षम
४आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली नियमातील आहे. त्यांच्या बदलीसाठी माझे वडील सुशीलकुमार शिंदे किंवा मी प्रयत्न केलेले नाहीत. यापूर्वी झालेली बदली थांबवली होती. आता थांबवणे शक्य नव्हते. अजित जाधव यांच्यासारखे सक्षम अधिकारी आम्ही महापालिकेत आणत आहोत.’’
- प्रणिती शिंदे, आमदार

मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
सह्यांचे रजिस्टर आणि निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून देणार आहे. त्यासाठी त्यांच्या कार्यालयाकडून वेळ घेऊ, असे नगरसेवक आनंद चंदनशिवे म्हणाले. आम आदमी पार्टीने गुडेवारांच्या बदलीचा निषेध व्यक्त केला.