आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सुवर्ण सिद्धेश्वर मंदिर’ प्रकल्पाची अधिकृत घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरचा मानबिंदू असणार्‍या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराचे "सुवर्ण सिद्धेश्वर'मध्ये रूपांतर करण्याची अधिकृत घोषणा देवस्थान पंचकमिटीने शुक्रवारी केली. यात्रा काळात दिव्य मराठीने "सुवर्ण सिद्धेश्वर' ही संकल्पना मांडली आणि त्यातूनच या अभियानाला चालना मिळाल्याचे पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मंदिराचा गाभारा हा चांदी-सोन्याने मढवणे हा सुवर्ण सिद्धेश्वर संकल्पनेचा पहिला टप्पा असणार आहे.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने हे कार्य पूर्ण होईल. यासाठी अनेक मदतीचे हात समोर येण्याची गरज आहे. सद्भक्तांनी सोने, चांदी रकमेच्या रूपात सढळ हाताने मदत करावी असे आवाहन काडादी यांनी केले आणि तासाभरात २५ किलो चांदी आणि ४५ ग्रॅम सोने पंचकमिटीकडे जमा झालेही. कर्ता करविता सिद्धेश्वर असून तोच आपल्या भक्तांच्या माध्यमातून हे कार्य पूर्ण करून घेईल, असा दृढ विश्वास श्री. काडादी यांनी व्यक्त केला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, विश्वनाथ आळंगे, अ‍ॅड. आर. एस. पाटील, बाबूराव नष्टे, रूद्रेश माळगे, सोमशंकर डुमणे, मल्लिकार्जुन वाकळे, बाळासाहेब भोगडे, काशीनाथ दर्गोपाटील, शिवानंद पाटील, महेश अंदेली, नंदकुमार मुस्तारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सव्वादोन कोटींचे सुशोभीकरण कार्यही
सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण प्रेक्षणीय होण्यासाठी आर्किटेक्ट लब्बा यांनी केलेल्या संकल्पचित्राच्या नियोजनानुसार सव्वा दोन कोटीं रूपये अंदाजित खर्च अपेक्षित आहे.

अनुभव मंडप उभारणी
मुख्य मंिदरातील सभामंडप हा सुमारे ९० वर्षापूर्वीचा आहे. त्याची दुरूस्ती नूतनीकरणाचे कार्य हाती घेण्यात येईल. या सभामंडपातील व्यासपीठ हे अध्यात्मिक अनुभव मंटप बनवण्याचा प्रयत्न राहील. यात पूजा, प्रवचन, व्याख्यान, अध्यात्मिक कार्यक्रम सर्वांना घेता येईल.

महिनाअखेर भक्तनिवास सेवेत
मंिदर परिसरात रात्रमुक्कामाची सोय नव्हती. ही बाब लक्षात घेत २०० जणांचे भक्तनिवास या महिन्याअखेरपर्यंत सेवेत दाखल होईल. भक्तांची संख्या वाढली असल्याने कन्नड शाळेचे रूपांतरण भक्तनिवासात करण्यात आले आहे.

पहिल्या तासाभरातील देणगीदार असे
०.५ किलो चांदी - गौरीशंकर डुमणे
२५० ग्रॅम चांदी - किरण भंडारी
१.२५ किलो चांदी - सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी कर्मचारी वर्ग
५ किलो चांदी - धर्मराज अण्णाराज काडादी, सोमशंकर देशमुख, कुमार करजगी
१ किलो चांदी - मल्लिकार्जुन वाकळे, संदेश भोगडे, काशिनाथ दर्गोपाटील, अ‍ॅड. व्ही.एस. आळंगे, रूद्रेश माळगे, अ‍ॅड. आर.एस. पाटील, सिद्धेश्वर सास्तूर, महेश अंदेली, विकास तंबाखे,

देणग्यांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू
देणग्या स्वीकारण्यासाठी देवस्थानात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. बँकेच्या माध्यमातून, ऑनलाइन पद्धतीनेही देणगी देता येईल. देणगीला ८० जी कलमान्वये करातून सूट मिळेल. चालू खाते क्र. ३४१७५८११२८०, स्टेट बँक ऑफ इंडिया, ट्रेझरी शाखा, सोलापूर या खात्यावरही रोख देणगी जमा करता येईल.” धर्मराज काडादी, अध्यक्ष, सिद्धेश्वर देवस्थान समिती

१५ वर्षापूर्वी सर्वोच्चन्यायालयाचे न्यायमूर्ती सिंघ आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे मंिदरात दर्शनाला आले असता मंदिर अमृतसर सुवर्णमंदिरासारखे भासते अशी सहज भावना व्यक्त केली होती.
बातम्या आणखी आहेत...