आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swabhimani Raju Shetty In Solapur For Upcoming Election

राष्ट्रवादीच्या साखरपट्ट्यात स्वाभिमानीने लावला सुरूंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, त्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी सोलापूर जिल्ह्यातून सुरूंग लावला आहे. राष्ट्रवादीचे निष्ठावंत सुधाकर परिचारक यांचे पुतणे व जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष प्रशांत परिचारक यांना उमेदवारी देऊन सलामी दिली आहे.
विशेष करून राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या माळशिरस, करमाळा व सांगोला या मतदारसंघांतही शेतकरी संघटना ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येणार नाही, अशाच पद्धतीने शेतकरी संघटना व्यूहरचना आखत असल्याचे चित्र आहे.

प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी माढा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक लढवून पाया मजबूत केल्यानंतर आता थेट राष्ट्रवादीचा गड सर करण्यासाठी मावळ्यांची जमवाजमव सुरू केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील विशेषत: साखर पट्ट्यावर शेतकरी संघटनेचे अधिक लक्ष आहे. इचलकरंजी मतदारसंघापुरती मर्यादित असलेली शेट्टी यांची शेतकरी संघटना प्रथमच इतर जिल्ह्यात प्रवेश करत आहे. शिवाय सेना, भाजप व रिपाइं पक्षांशी असलेल्या युतीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी संघटनेच्या नेते, कार्यकर्त्यांना सोबत घेत थेट राष्ट्रवादीच्याच गडावर आक्रमणासाठी सज्ज आहेत.

जागा वाटपाची चर्चा सुरू असली तरी कोणाला कोठे मदत करायचे व कोणाची कोठे मदत घ्यायची याचा अचूक अंदाज बांधण्यासाठी शेतकरी संघटनेचे तालुका पातळीवरील कार्यकर्ते काम करत आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल, सत्ताधारी दोन्ही कॉंग्रेसवरील नाराजी या दोन्हीचा फायदा घेण्यासाठी संघटना सरसावली आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या पंढरपूर, माळशिरस, करमाळा व माढा या मतदारसंघावर शेतकरी संघटनेचे विशेष लक्ष आहे. माढा वगळता पंढरपूर, माळशिरस व करमाळा या तीन जागा शेतकरी संघटनेस मिळाव्यात, अशी मागणी केल्याचे खोत यांनी सांिगतले.

दोन-तीन दिवसांत निघेल तोडगा
भाजप आणि सेना यांची जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. यामुळे आम्ही घटकपक्ष या नात्याने जिल्ह्यातील काही जागांची मागणी केली आहे. माढा लोकसभा निवडणुकीतील अनुभव पाहता अधिक जागा मिळाव्यात, अशी मागणी आहे. १७ िकंवा १८ सप्टेंबरपर्यंत यावर तोडगा निघेल, त्यानंतर आमच्या जागा व उमेदवाराबाबत सांगता येणार असल्याचे शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

राष्ट्रवादीच्या उमेदवाराची करणार कोंडी
गेल्या निवडणुकीत भालके हे शेतकरी संघटनेच्या मदतीनेच निवडून आले आहेत. यामुळे पंढरपूर मतदारसंघामध्ये जिल्हा दूध संघाचे प्रशांत परिचारक यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता. माळशिरस मतदारसंघ संघटनेस मिळाल्यास जानकर यांना िरंगणात उतरवण्याची शक्यता तर करमाळा मतदारसंघातही राष्ट्रवादीच्याच नेत्याला संधी दिली जाणार आहे.
अशा प्रकारे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी शेतकरी संघटनेची व्यूहरचना आखण्यात आल्याचे चित्र असले तरी जागा वाटपानंतर हेच चित्र असेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पंढरपूर मतदारसंघ संघटनेला मिळावा
गेल्या निवडणुकीत भालके हे शेतकरी संघटनेच्या मदतीनेच निवडून आले आहेत. यामुळे पंढरपूर शेतकरी संघटनेला मिळावा. शिवाय माळशिरस व करमाळा मतदारसंघामध्येही शेतकरी संघटनेची ताकद मोठी असल्याने आम्ही मागणी केली आहे.” सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.