आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी समर्थ कारखाना निवडणूक १४ जूनला मतदान, १६ ला निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दहिटणे(ता. अक्कलकोट) येथील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. १५ मेपर्यंत त्याची मुदत आहे. त्यानंतर १६ मे रोजी छाननी आणि १८ मे रोजी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जूनपर्यंत अर्ज माघारीची मुदत असून, त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. आनंद जोगदंड यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सहकारी संस्थांचे शहर उपनिबंधक बी. एस. कटरे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. कारखान्याच्या एकूण २१ संचालकपदाच्या जागांसाठी ही निवडणूक होईल. अक्कलकोट, सुलेरजवळगे, नागणसूर, सलगर, वागदरी अशा मतदार संघांतील प्रत्येकी प्रमाणे १५ संचालक निवडून द्यायचे आहेत. त्यानंतर उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था मतदारसंघातून १, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून १, महिला राखीवमधून २, इतर मागासवर्गीय आणि भटक्या जाती विमुक्त जमाती मतदारसंघातून असे एकूण संचालक निवडून द्यायचे आहेत.
राजकीय प्रतिस्पर्धी तत्कालीन गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे सत्ता मिळवण्यासाठी यापूर्वी कारखाना निवडणूक मैदानात उतरले होते. परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी म्हेत्रे यांनी स्वत: समभाग जमा करून ‘मातोश्री कारखाना’ काढला. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत श्री. म्हेत्रे उतरणार नाहीत, असे सांगण्यात येते. परंतु श्री. पाटील त्यांना आव्हान देतात. यंदाच्या निवडणुकीतही त्यांनी म्हेत्रेंना आव्हान दिले तर चुरस अटळ आहे.

एस.एम पाटीलांचे वर्चस्व
भाजपचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या ताब्यात हा कारखाना आहे. पूर्वी इंदिरा सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव होते. श्री. पाटील यांनी ताबा मिळवल्यानंतर त्याचे नाव बदलले. गेल्या काही वर्षांपासून कारखान्यावर त्यांचीच सत्ता आहे.
बातम्या आणखी आहेत...