आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: मराठी भाषेच्या कक्षा रुंदावताहेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- मराठी चित्रपटसृष्टीत अभिरूचिसंपन्न, दर्जेदार कलाकृतींची निर्मिती पूर्वीपासूनच होत आहे, पण खऱ्या अर्थाने त्याला चांगले दिवस आता लाभले आहेत. दुबईसारख्या ठिकाणी मराठी चित्रपटांच्या गौरवासाठी ‘मिक्ता’सारखा पारितोषिक वितरण सोहळा होत आहे. मराठी भाषा नि चित्रपटकलेच्या कक्षा रूंदावणे ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा कलावंत स्वप्निल जोशी याने सांगितले.
एरवी शूटिंग, प्रवासामध्ये व्यस्त असलेला स्वप्निल जोशी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी शनिवारी सोलापुरात आला होता. या वेळी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने त्याच्याशी संवाद साधला. या वेळी स्वप्नील जोशी याचा अभिनयासह भक्तीचा पैलू पाहायला मिळाला.
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरासमोरील ज्योतिबा मंडपात नामस्मरणात दंग असलेला स्वप्नील जोशी
भक्तीचा लाभला असा अनुभव सहावर्षांपूर्वी आईची अँजिओप्लास्टी असताना श्रीसिद्धीविनायक मंदिरात गेलो. दर्शनाला साडेसात तास लागले, यातून बरेच उमजून आले. मी कायम जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करतो. हरिद्वारमधील मंदिराच्या लोकार्पणावेळी कृष्णाच्या वेशातील भगवंतांचे दर्शन घ्यायला जमलेला समुदाय अजूनही आठवतो. मुंबईतील लक्ष्मी टॉकीजला तर दररोज ५० बसेस दर्शनाला यायच्या त्यातील १० बसमधील भाविकांना मी कृष्णाच्या वेशात दर्शन द्यायचो.
नामस्मरण करणारा कलावंत
युवाश्रीकृष्ण, दुनियादारी, मंगलाष्टक वन्स मोअर, प्यारवाली लव्ह स्टोरी, मितवा मधील रोमँटीक हिरो छाप असलेल्या स्वप्निल जोशीचा एक वेगळाच पैलू रविवारी समोर आला. तो कट्टर स्वामीभक्त तर आहेच दरवर्षी अक्कलकोटला येऊन नामस्मरण करतो.
अध्यात्मिक पण..
मीधार्मिक आहे, पूजापाठ किंवा 16 सोमवारवाला नाही. श्रद्धा भक्ती मनातून आहे. अंतर्मनात देव पुजतो. मागील 35 वर्षांपासून स्वामींची सेवा सुरू आहे. पूर्वी गिरगावच्या कांदेवाडी येथे मठात वडील त्याचे मित्रपरिवार पूजा करायचे. ती प्रथा अजूनही सुरू आहे. वडिलांनीच आम्हा दुऱ्यापिढीला संप्रदयात आणले. वडील मोहन, आई अनुराधा, पत्नी लिना तसेच मुंबईच्या स्वामी समर्थ परिवारातील 55 ते 60 सदस्य आलो असल्याचे त्याने सांगितले.