आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swimmer Rutik Get New Life, Over Come On Shoulder Tissue Disease

जलतरणपटू ऋतिकाला व्यायामाने नवसंजीवनी!,शोल्डर टिश्यू’ नामक दुर्धर आजारावर मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - हात आणि खांदे हे डायव्हिंग या खेळाचा प्राण. म्हणजे खांदा दुखत असेल किंवा हात वळत नसतील तर पोहणे अशक्य आहे. ऐन उमेदीच्या काळात नेमक्या याच ‘शोल्डर टिश्यू’ नामक दुर्धर आजाराने ऋतिका पार्वतय्या श्रीराम या जलतरणपटूला गाठले. पोहता येत नसल्याने कारकीर्द संपली असेच तिला वाटले. मात्र, डॉ. संदीप भागवत नावाचा देवदूत मदतीला धावला. त्यांनी यशस्वी उपचार करून ऋतिकाला नवसंजीवनीच दिली. आता ती नव्या उमेदीने सराव करत आहे. या वेळी तिच्या चेह-यावर दुर्धर आजाराचा लवलेशही दिसत नाही.
सोलापूरच्या ऋतिका श्रीराम या आंतरराष्ट्रीय डायव्हिंगपटूची ही करुण कहाणी. शहर, जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय असा तिचा प्रवास सुरू होता. अथक परिश्रमानंतर 2010 मध्ये दिल्लीत राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऋतिकाने धडक दिली. आणि याच वेळी तिला खांदेदुखीने गाठले. उजवा हात वळेनासा झाला. मग 2 वर्षे तिचे पोहणे बंद झाले अन् दुखापतीवर उपचारांना यश येत नव्हते. अशातच राष्ट्रकुल स्पर्धेवेळी ऋतिकाच्या थेरपिस्ट नेहा पिलापकर यांनी सोलापूरच्या डॉ. संदीप भागवतांकडे जाण्याचा तिला सल्ला दिला. फिजिओथेरपिस्ट भागवतांनी मे 2013 मध्ये उपचार सुरू केले आणि अवघ्या सहा महिन्यात चमत्कार झाला. डॉक्टरांनी तिच्यावर ‘मॅट्रिक्स -िहदमस्् थेरपी’द्वारे मोफत उपचार केले. फक्त दहा वेळा 1 तासाचे उपचार केले. या उपचारांत औषधांव्यतिरिक्त शरीराला कंपने देतात. त्यामुळे पेशींच्या आजूबाजूचे रक्ताभिसरण सुधारले. सोबतीला व्यायामाची जोड होतीच. परिणामी सांध्याच्या हालचाली पूर्ववत झाल्या.
अशी आहे थेरपी
रुग्णाचा शरीराराचा कोणताही सांधा दुखावल्यानंतर त्या जागेवर विशिष्ट यंत्राच्या साहाय्याने सुमारे अर्धा तास कंपन केले जाते. त्यामुळे आतील स्नायूंचा रक्तपुरवठा चालू होतो. स्नायू सैल होतात व रुग्णाची हालचाल पूर्ववत होते. रुग्णाच्या आजारानुसार आठवड्यातून एक वेळेस किमान तीन ते पाच तास हा उपचार घ्यावा लागतो. या उपचार पद्धतीचा उगम जर्मनीत झाला. कोणत्याही औषधाविनाची ही उपचार पद्धती आंतरराष्ट्रीय पातळीवर 10 वर्षांपासून वापरली जाते.
दुबळेपणा झटकून भरारी : यशस्वी उपचारानंतर तिने दुबळेपणा झटकून त्रिवेंद्रममध्ये राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत तिने 3 रौप्यपदके कमावली. आता स्कॉटलंडमध्ये होणा-या राष्ट्रकुल स्पर्धेत स्थान मिळवून पदक जिंकण्याचे तिचे ध्येय आहे.