आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाकळीत पोलिसांनी पकडले 1 कोटी रुपयांचे चंदन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण सोलापूर - टाकळी(ता. दक्षिण सोलापूर) येथील चंदन कारखान्याला वनविभागाने सील ठोकलेले असतानाही सुरू असलेली चंदनाची तस्करी जिल्हा पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू सहाय्यक पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी छापा टाकून उघडकीस आणली. गुरुवारी (दि. २४) दुपारी तीन वाजता केलेल्या कारवाईतून मोठ्या प्रमाणात चंदनाचा साठा मिळाला असून, रात्री उशिरापर्यंत याचा पंचनामा सुरू होता. एकूण २० पोत्यांमधून अंदाजे कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, पहाटेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
पोलिस अधीक्षकांनी स्वत: कारवाई केली असताना जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अधिकारी सुभाष बडवे यांनी आपणाला कारवाईची माहितीच नसल्याचे 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले. सोलापूर - विजापूर महामार्गावर टाकळी बसस्थानकापासून काही अंतरावर गुरुसिद्धप्पा बिराजदार यांच्या शेतातील चंदन फॅक्टरीवर ही कारवाई झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक प्रभू, सहाय्यक अधीक्षक उपाध्याय ग्रामीण पोलिसांचे ४० ते ५० जणांचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते. रात्री उशिरापर्यंत या कारखान्यातील चंदनाच्या लाकडांची मोजदाद सुरू होती. अंदाजे एक टनपेक्षा जास्त चंदन असल्याचे सांगण्यात आले.

विशेष म्हणजे या चंदन कारखान्यावर पाच वर्षांपूर्वी वन विभागाने कारवाई करीत त्याला सील ठोकले होते. असे असतानाही येथून बिनबोभाट चंदनाची तस्करी सुरूच होती, हे या कारवाईने उघडकीस आले आहे.
जुगारानंतर आता चंदन तस्करी
दोनच दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी टाकळी येथील शिवसेनेचे नगरसेवक लक्ष्मण जाधव यांचा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. गुरुवारी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रभू यांनी चंदनाची तस्करी उघडकीस आणत मोठा साठा जप्त केला. या कारवाईने वन विभाग मंद्रूप पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. टाकळी हे सीमेवरील गाव असल्याने मटका, जुगार इतर अवैध व्यवसायांचा अड्डा असल्याचे या कारवाईने स्पष्ट होते.

वन विभागाचे दुर्लक्ष
टाकळीच्याचंदन कारखान्यावर वन विभागाने कारवाई करत चंदन साठ्यासह कारखान्याला पाच वर्षांपूर्वी सील ठोकले. मात्र, त्यातील चंदनाचा साठा त्यांनी ताब्यात घेऊन जप्त केला नाही. जर या फॅक्टरीतून पुन्हा चंदनाची तस्करी होत असेल तर त्यावर कारवाई का केली नाही, हा प्रश्न निर्माण होतो. पोलिस अधीक्षकांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात चंदन मिळाल्याने वन विभागाची बेपर्वाई उघड झाली.
बातम्या आणखी आहेत...