आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Take Action On Mayor Of Solapur Aap Party Demand

महापौरांच्या ‘आदर्श’ कामांवर कारवाई करा- 'आप'ची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापौर अलका राठोड यांच्या घराचे मोजमाप गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास करण्यात आले. घराचे वाढीव बांधकाम विनापरवाना केल्याप्रकरणी ही मोजणी झाली. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी अधिकार्‍यांस पाहणी करण्याचे आदेश दिले होते. अधिकार्‍यांकडून पाहणी झाली. नंतर आयुक्तांनी तीन अधिकार्‍यांची समिती नेमली. तीत उपायुक्त डॉ. पंकज जावळे, प्रभारी नगर अभियंता गंगाधर दुलंगे, उपअभियंता दीपक भादुले यांचा समावेश आहे. महापालिकेचे उपअभियंता आर. डी. जाधव आदींनी एक तासात मोजणीचे काम पूर्ण केले. याचा अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

कागदपत्रे न दिल्याचा फटका
राठोड यांच्या घराच्या वाढीव बांधकामासाठी 3 ऑक्टोबर 2013 रोजी ऑटो डी आर पद्धतीने बांधकाम परवानगी मागितली. त्यावेळी त्यांनी ऑनलाइन नकाशा सादर केला. 9 ऑक्टोबर रोजी महापालिकेने सर्व कागदपत्रे सादर करण्याचे पत्र पाठवले. मात्र त्यांनी 29 जानेवारी 2014 रोजी सर्व कागदपत्रे सादर केली. कागदपत्रे सादर केल्यानंतर 60 दिवसांच्या आत बांधकाम परवाना देणे बंधनकारक असते. त्यांनी मुदतीत कागदपत्रे न दिल्याचा फटका बसल्याचे दिसत आहे.

दिल्लीचा ध्येयवेडा मुख्यमंत्री, केंद्रीय शहाणा गृहमंत्री
दिल्लीचा ध्येयवेडा मुख्यमंत्री तर केंद्रीय शहाणा गृहमंत्री अशा आशयाचा फलक लावण्यात आला होता. ‘जो महिलांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतो तो वेडा मुख्यमंत्री, जो सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर आंदोलन करतो तो वेडा मुख्यमंत्री’ आणि ‘जो महापौरांच्या बंगल्याचे व सुशील रसिक सभागृहाचे बेकायदेशीर बांधकाम करणार्‍यांना पाठीशी घालतो तो शहाणा, मनपा आयुक्तांना दमदाटी करणार्‍या नगरसेवकांवर कसलीही कारवाई होऊ न देणारे तो शहाणा,’ असे लिहिले होते.