आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुमारे सातशे वाहनांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- आपल्या दुचाकीला फॅन्सी नंबर प्लेट आहे का? वाहनांची कागदपत्रे आहेत का? पीयूसी, वाहन परवाना अशा सर्व बाबी असतील तर आपले वाहन रस्त्यावर आणा अन्यथा वाहतूक पोलिसांच्या जाळ्यात अडकलात तर कारवाईला सामोरे जावे लागेल. तीन दिवसांत सुमारे सहाशेहून अधिक वाहनांवर वाहतूक पोलिस आणि आरटीओ विभागाने कारवाई केली.
शिस्त मोडण्यात धन्यता मानणाऱ्या सोलापूरकारांना चांगला चपराक बसली आहे. वाहतूक शिस्त लावण्यासाठी पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी चांगले पाऊल उचलले आहे. त्याचे नागरिकांतून स्वागत होत आहे. ही मोहीम नव्याचे नऊ दिवस होऊ नये, कायमस्वरूपी असल्यास सोलापुरात शिस्त येण्यास वेळ लागणार नाही.
कारवाईत एकदा गाडी पोलिसांनी पकडली की कारवाई पूर्ण होण्याकरता दोन दिवस लागतात. कारवाईनंतर पोलिस संबंधित पोलिस ठाण्यात दुचाकी लावतात. पोलिस चालकाला मेमो देतात. आरटीओत जाऊन कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर एनओसी देण्यात येते. ती पोलिसात दाखवल्यानंतर वाहन सोडण्यात येते. या सक्षम कारवाईमुळे वाहनचालकांना शिस्त लागत आहे.
तीन दिवसांत सहाशेहून अधिक वाहनांवर कारवाई केली, अशी माहिती साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...