आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाठय़ांनी दिला काम बंद आंदोलनाचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शेवरे (ता. माढा) येथील भीमा नदीतून अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाईसाठी गेलेले तहसीलदार रमेश शेंडगे व त्यांच्या पथकावर वाळू तस्करांनी जीवघेणा हल्ला केला. त्या हल्लेखोरांवर मोक्का कायद्यान्वये गुन्हे दाखल होईपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने दिला.

तलाठी व कोतवाल संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी त्या कारवाईच्या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांना दिले.

भीमा नदीतून वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याची माहिती, तहसीलदार शेंडगे यांना मिळाली. मंगळवारी (ता. 10) सायंकाळी त्यांनी त्वरित दोन मंडलाधिकारी, 16 तलाठी व 10 कोतवालांसह शेवरे येथे गेले, असता वाळू तस्करांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. शासकीय वाहनाचे टायर फोडले, तलाठय़ांच्या मोटारसायकलींची मोडतोड करण्यात आली असून शस्त्राचा धाक दाखवत दहशत निर्माण केली.

त्या घटनेचा तलाठी संघटनेतर्फे निषेध करण्यात आला. तहसीलदार, तलाठी व कोतवालांवर हल्ला करणार्‍यांवर मोक्का कायद्यान्वये गुन्हे दाखल होईपर्यंत कामबंद आंदोलन करणार असल्याचे, सोलापूर जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष अब्दुलरजाक मकानदार यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस राजकुमार पांडेकर, सरचिटणीस मल्लिनाथ स्वामी, राजशेखर लिंबारे, कार्याध्यक्ष उत्तम देवकते, उपाध्यक्ष डी. आर. माने, विलास देशपांडे, सहचिटणीस अरुण घोडके आदी उपस्थित होते.