आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tantamukt Villege Pangaon Clashesh Between Two Group

तंटामुक्त पानगावात तुंबळ हाणामारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी - या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वैराग पोलिसात नोंद झाली नव्हती.महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेअंतर्गत विशेष शांतता पुरस्काराने सन्मानित होऊन, नऊ लाखांच्या बक्षिसास पात्र ठरलेल्या पानगावातील (ता. बार्शी) दोन गटांत मंगळवारी पैशाच्या कारणावरून हाणामारी झाली.

पानगावात काळे (देशमुख) व मोरे (पाटील) या दोन गटांचे प्राबल्य आहे. त्यांच्यात राजकीयदृष्ट्याही चुरस असते. या दोन्ही गटांतील नेहमीचे तंटे कमी करण्यात तंटामुक्ती समितीला यश आले होते. याच कामाची दखल घेऊन गावाला विशेष शांतता पुरस्कारही जाहीर झाला होता. इतकेच नव्हे तर त्यांचा आदर्श इतरांसमोर ठेवण्यासाठी ‘असे घडले पानगाव’ नावाचा माहितीपटही दाखवण्यात येत आहे. सोमवारी काळे व मोरे गटांतील व्यक्तींमध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीवरून बाचाबाची झाली. हा राग मनात धरून काळे गटातील लोक संतापले. त्यांनी मोरे गटातील एकाला मंगळवारी सकाळी लाठय़ा-काठय़ांनी झोडपून काढले. सुमारे 15 मिनिटे बसस्थानकाजवळ हा गोंधळ सुरू होता. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय काळे यांनी दोन्ही गटांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण मिटले. विशेष म्हणजे पानगावातील पोलिस पाटलाचे पद गेल्या तीन वर्षांपासून रिक्त आहे.