आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tapdiaya Family Return In Solapur From Uttarakhand

नदीचा प्रवाह हृदयाचे ठोके चुकवणारा; परतलेल्या तापडिया परिवाराने सांगितली कथा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘भगवान की कृपा हैं आप आगए’ उसे उद्गार उत्तराखंड येथून सुखरूप सोलापूरला पोहोचल्यानंतर तापडिया कुटुंबीयांनी काढले. उत्तराखंड येथे आलेल्या प्रलयामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत आपले कुटुंब सुखरूप घरी पोहोचल्याच्या आनंदाने आणि समाधानाने तापडिया कुटुंबीयांनी आंनदार्शुंना वाट मोकळी करून दिली.

रामानुजदास तापडिया मुलगा र्शीकांत, सून रमा आणि नात तेजस्विनी व र्शेयस, घरातील नोकर गोवर्धन व लक्ष्मीबाई शिवाळ यांच्यासह केदारनाथच्या यात्रेसाठी गेले होते. अतिवृष्टीने आलेल्या प्रलयात अडकून पडले. त्यांनी आपला अनुभव सांगितला.

‘‘आम्ही 14 जून रोजी जानकी चट्टीला पोहोचलो. रात्री तेथे थांबून यमनोत्रीसाठी सकाळी प्रयाण झाले. टेकडीवर पालखीच्या सहाय्याने जाऊन आलो. येथून फुल चट्टीकडे निघालो. पाऊस जोरात असल्याचे समजताच ते रद्द करून बडकोटकडे निघालो. बडकोटला जात असताना आम्ही पुढे जात होतो आणि मागे सर्व भयानक चित्र पहावयास मिळाले. दहा किलोमीटरपर्यंत आल्यानंतर सर्व रस्ते बंद पडले आणि आम्हाला पोलिसांनी थांववले व आम्ही तेथेच थांबलो. केदारनाथपासून आम्ही 90 किलोमीटर लांब होतो.

‘‘आम्ही जेथे थांबलो तेथे गढवाल टुरिझमवाल्यांनी लॉजवर उत्तम सोय केली होती. परंतु तेथेही पाण्याची कमतरता होती. विद्युत पुरवठा बंद होता. 24 तासांतून फक्त दोन तास जनरेटर चालू करून मोबाइल चार्ज करत होतो. पाण्याच्या प्रवाहामुळे सर्व रस्ते अदृश्य होते. आमच्या समोरच लोकांना जेवण मिळत नव्हते, मिळेत ते खाऊन लोक राहात होते. हे चित्र पाहून अंगाला शहारे येत हेाते. आम्ही सारखे बाहेर येऊन पोलिसांना कधी घेऊन जाणार याबाबत विचारत होतो. परंतु त्यांचा वॉकीटॉकी बंद होता. तसेच हेल्पलाइन 15 ते 20 वेळा प्रयत्न केल्यानंतर एकदा लागणार आणि तेथून फक्त ‘आप फ्री हो जाएंगे’ इतकेच उत्तर मिळत होते. सोलापूरला परत येण्याची गॅरंटी तर नव्हती. मात्र, एका कोपर्‍यात आशाही होती. परमेश्वरावर विश्वास होता.’’

‘‘पाच दिवसांनंतर आम्ही देहरादूनकडे निघालो. वाहतुकीची कोंडी असल्यामुळे 150 किलोमीटर अंतर जाण्यासाठी आम्हाला 12 तास लागले. पुलाची अवस्था दयनीय झाली होती. पुलावरून जाताना जीव मुठीत धरून जावे लागत होते. कारण, पुलावरून आमची कार झोका घेतल्यासारखी होत होती. रस्त्यामध्ये आठ ते दहा पूल होते. खाली पाहिले की नदीमधील पाण्याचा प्रवाह हृदयाचे ठोक वाढवणारा होता. तेथील एक मुलाने आम्हाला शॉटकट मार्ग दाखवला म्हणून आम्ही लवकर पोहोचलो. देहरादून येथून विमानाने दिल्ली आणि नंतर पुणे गाठले. पुण्यातून शताब्दी एक्स्प्रेसने आम्ही शनिवारी सकाळी सोलापूरला आलो.’’