आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकांनी पाहिला रस्त्यावरील बर्निंग सुमोचा थरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - टाटा सुमोने अचानक पेट घेतला. पाहता पाहता ती खाक झाली. सोमवारी भरदुपारी हा बर्निंग कारचा थरार कस्तुरबा मंडई परिसरात लोकांनी अनुभवला. पेटत्या गाडीत कोणीही नसल्याने सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

दुपारी चारच्या सुमारास कस्तुरबा मंडईच्या पाठीमागील दरवाजाजवळ सुमो (एम एच 13 एन 2739) कडेला लावून लोक उतरले. काही वेळाने अचानक इंजनमधून धूर येऊ लागला. त्यानंतर गाडीने पेट घेतला. क्षणार्धातच ज्वाळा तीव्र झाल्या. आगीच्या लोळासह सुमो एका कडेहून दुसर्‍याकडेला गेली. जवळपास 20 फुटाचा रस्ता ओलांडत दुसर्‍याकडेला पदपथावर चढून झाडावर जाऊन आदळली. जाताना तेथे उभ्या असलेल्या उमेश मिर्शा यांच्या यामाहा दुचाकीस (एम एच 13 एजी 0093) धडक दिली. आग विझवण्याचा प्रयत्न लोकांनी केला. दरम्यान, अग्निशामक दलाचे फायरमन विनायक पतंगे यांनी ती आग शांत केली. पण, तोपर्यंत गाडी खाक झाली होती.

क्षणार्धात सगळे खाक
मंडईत साहित्य घेण्यासाठी आलो होतो. गलका पाहून तेथे धावलो. आगीची तीव्रता पाहून पाण्याचा बंब येण्याआधी एकास विनंती करून घरगुती मोटारला पाइप जोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला.’’ विनायक पतंगे, फायरमन

नशिब बलवत्तर
गाडी लावून मंडईत गेलो होतो. येईपर्यंत गाडी आग विझवण्याच्या परिसीमेबाहेर गेली होती. आम्ही उतरलो आणि ही घटना घडली. नशिब बलवत्तर होते म्हणून आम्ही बचावलो. आगीचे रौद्ररुप पाहून थरकाप उडाला होता.’’ विष्णूपंत भोसले, गाडी मालक

कसे झाले समजलेच नाही
गाडीतून सर्वजण खाली उतरुन मंडईत गेले. थोड्यावेळाने गाडीतून धूर येऊ लागला. थोड्या वेळाने धुराचे प्रमाण वाढले. धावत जाऊन ड्रायव्हरने गाडीचे दरवाजे उघडले. तोपर्यंत आग भडकली होती. टायर फुटले. गाडी रस्त्याच्या दुसर्‍या बाजूस आपोआप गेली. कोणी जखमी झाले नाही, हे सुदैव.’’
सोनाली रेऊरे, घटना पाहणारी