आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तौफिक शेख ‘एमआयएम’चे प्रभारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ऑलइंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लमीन (एआयएमआयएम)च्या सोलापूर पक्षप्रभारीपदी तौफिक शेख यांची निवड झाली आहे.पक्षाने आगामी महापालिका निवडणुका लक्ष ठेवून दोन वर्षांपूर्वी आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत.

पक्ष संघटन करणे, प्रत्येक वॉर्डात अध्यक्ष नेमणे, बूथनिहाय कार्यकर्त्यांची बांधणी करणे, जास्तीत जास्त क्रियाशील सभासद करणे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे, त्रस्त नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणे आदी कामांची आखणी करण्यात आल्याची माहिती शेख यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची तयारी पक्षाची आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश गावडे, इम्तियाज अल्लोळी, कोमारोव्ह सय्यद, जावेद सय्यद, अश्पाक शेख, शुकूर मनाजी, अश्पाक शेख आदी उपस्थित होते.

सर्व जाती-धर्मातील लोकांचा पक्ष
सर्वजाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन नागरिकांचे सर्व प्रश्न सोडवून एमआयएम पक्षाने केलेला विकास आणि ध्येय काविरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल. आगामी महापालिका निवडणुकीचे लक्ष ठेवत पक्ष संघटन मजबूत करून जास्तीत जास्त उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले जातील. तसेच सोलापूर शहरात हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस आहे.” तौफिकशेख, पक्षप्रभारी,सोलापूर