आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर महापालिकेचे थकले कोट्यवधी रुपये; थकबाकीदारांची यादी जाहीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- करापोटी एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या हद्दवाढ भागातील मिळकतदारांची यादी महापालिकेने मंगळवारी प्रसिद्ध केली आहे. मनपाने अशी यादी पूर्वीही प्रसिद्ध केली, मात्र पुढे काहीच कारवाई झाली नाही. मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम 1949 नुसार कारवाई करण्याचा अधिकार असताना दबावापोटी कारवाई केली जात नाही. महापालिकेने जाहीर केलेल्या थकबाकीदारांच्या यादीत मंत्रिचंडक कन्स्ट्रक्शन, अनिल पंधे, गणेश आपटे, डॉ. बसवराज कोलूर, सिंहगडचे मारुती नवले, वल्याळ डेंटल हॉस्पिटल, माजी नगरसेवक महेश थोबडे, बाबुभाई मेहता, युवराज चुंबळकर, सुनंदा टाकळीकर, संगिता रामकृष्ण कोंड्याल, अजय दासरी, चेतन फौन्ड्री, समीरखान बेरिया आदींचा समावेश आहे. या मंडळींकडून महापालिका प्रशासन कठोरपणे कारवाई करून वसुली करणार काय हा प्रश्न अनुत्तरित आहे.

शहरातील काही थकबाकीदारांची नावे (कंसात थकबाकीची रक्कम लाखांत):
शिवण्णा नागप्पा बिराजदार (1), मंत्रिचंडक कन्ट्रक्शन, दहिटणे (2), विवेकानंद कोटा (2.98), सिद्धेश्वर रोलर अँन्ड फ्लोअर मिल प्रा. लि. (2.71), डॉ. बसवराज आणि डॉ. स्मिता कोलूूर (8), ब्रॉडगेज रेल्वे (1), टिकेकर टेक्स्टाइल वर्क्‍स को. ऑप. लि. (3.54), सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना (4), शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे हायस्कूल (2), गणेश रामचंद्र आपटे (2.68), मल्लव्वाबाई वल्याळ डेंटल हॉस्पिटल (7.53), महिला पोलिस प्रशिक्षण केंद्र (5), सुशीलाबाई गायकवाड बहुउद्देशीय संस्था (3), मारुती एन. नवले, अध्यक्ष सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेची 11 बिले (सुमारे 35 लाख), एसआरपी कॅम्प (1), सिद्धेश्वर रेवणसिद्धप्पा दुलंगे (1), राजीव मागासवर्गीय सोसायटी अध्यक्ष निलोफर मुजावर (3), शशीकला प्रदीप मोरे (2), पृथ्वीराज गांधी (2), मुकुंद धारिया (5), स्टर्लिंग मोटर्स (2), जयप्रकाश तापडिया (1), अनिल पंधे (3), संबोसिध्दी डेव्हलपर्स (2), राकेश कटारे (1.84), महेश थोबडे (2.82), केमार्क इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. (3.66), हारून मंगलगिरी (1), कृष्णा स्टोन इंडस्ट्रीज- प्रो. गोपाळ माहेश्वरी (2), गणेश स्टोन इंडस्ट्रीज- प्रो. गजानन धकडे (2), पश्चिम महाराष्ट्र विणकर सह संस्था (2), महाराष्ट्र सॉ मिल टिंबर र्मचंट अ. करिम शेख (1), निवास स्पिनिंग मिल (3), भद्रावती हातमाग विणकर सह. संस्था (2.79), लक्ष्मी बंडप्पा फुंडीपल्ले (2), एन. एच. पॉलिर्मस मीनादेवी भुतडा (1), सिद्धेश्वर टेक्स्टाइल्स प्रा. लि. (1), महिंद्रकर टेक्स्टाइल- गंगाधर महिंद्रकर (1), सोलार बीजी फॉर्मस प्रा. लि. (1), सर्मथ ऑर्गनिक्स प्रा. लि. (1), मंथने स्पिनिंग अँन्ड विव्हिंग मिल (1), हर्ष प्लास्टिक इंडस्ट्रीज- प्रो. हर्षवर्धन शहा (2.56), एम. बी. पोगुल वेस्ट कॉटन मिल (1), प्रेम टेक्स्टाइल- प्रो. नरसय्या पसनूर (7.60), अरुण व्यास (1.51), संगीता रामकृष्ण कोंड्याल (2), अजय आणि राजीव लक्ष्मीपती दासरी (2), चेअरमन, नरसिंह विडी कामगार सहकारी संस्था (1), बाबुभाई मेहता (1.76), सुनिता उडता (1), पौरवी शिक्षण प्रसारक मंडळ (1.73), एम. एस. सुरवसे, एच. ओ. केमिकल्स (1.90), महालिंग सिद्राम कांबळे (1.85), महानंद अशोक काजळे (1), रार्जशी कन्स्ट्रक्शन- भागीदार किशोर सांजेकर आणि ए. डी. दाते (3), राजेश चंद्रगुप्त गांधी (1.53), बी. वाय. कन्स्ट्रक्शन- प्रा. युवराज चुंबळकर (1), माधुरी ए. देशपांडे- भाडेकरी टॉवर व्हीजन इं. प्रा. लि. (2.55), नीता अशोक वागज, भाडेकरी अकसन एस्सार सेल्युलर लि. पुणे (1), विनायक नरसय्या राचर्ला (2.60), प्राइम डेव्हलपर्स- भारत पृथ्वीराज जैन (1), सुनंदा अजित टाकळीकर (1), भीमसेन बाकळे, संजय बाकळे, एम. बी. बाकळे (1), नागनाथ दत्तू गायकवाड (1.52), चेतन फौन्ड्री (11.74), शिवा कन्स्ट्रक्शन भागीदार अरविंद इच्छापने (2) आणि समीरखान यू. बेरिया (1.56).