आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Teacher Association President Dr.R.B.Singh At Solapur

'शिक्षकेतर कर्मचार्‍यांना यूजीसी वेतनश्रेणी देण्यासाठी वचनबद्ध'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शिक्षकांप्रमाणेच महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) वेतनश्रेणी लागू करण्यासाठी महासंघ वचनबद्ध राहील, असे आश्वासन अखिल भारतीय महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. बी. सिंह यांनी सोमवारी दिले.
लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव बावधनकर होते. लातूर युनियनचे रामनिवास मंत्री प्रमुख पाहुणे होते. यूजीसी वेतनश्रेणी लागू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची एनओसी मिळाली नसल्याची खंत व्यक्त करून डॉ. सिंह म्हणाले, ‘चार राज्याची एनओसी मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा चालू आहे. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. राज्यव्यापी संपादरम्यान ज्या मागण्या होत्या त्यापैकी 35 पेक्षा कमी स्टाफ असलेल्या महाविद्यालयाची नोकरभरती बंदी पूर्णपणे उठवण्यात आली आहे. अन्य महाविद्यालयांना 60 टक्के व पुढील वर्षी 40 टक्के पदे भरण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतल्याचे ते म्हणाले.

समान काम, समान वेतन
विद्यापीठात व महाविद्यालयात काम करणाºया कर्मचार्‍यांचे काम एकच आहेत. त्यामुळे ‘समान काम, समान वेतन’ ही महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचार्‍यांची मागणीसुद्धा शासनाने मान्य करण्यास हरकत नाही, अशी मागणी प्राचार्य डॉ. राजीव बावधनकर यांनी केली.