आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Teacher Eligibility Test News In Marathi, D.Ed, Education

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘टीईटी’तील चुकीचे प्रश्न रद्द करण्याचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करूनच शिक्षक होण्याची पुढील वाट मोकळी होणार आहे. म्हणूनच डीएड, बीएड झालेल्या बहुतांश युवकांनी टीईटी दिली. पहिल्यांदाच झालेल्या या परीक्षेत सहा विषयांचे चुकीचे ठरलेले तब्बल 38 प्रश्न रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला. मात्र, त्यांचा कोणताही फायदा परीक्षार्थींना होणार नाही.
शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा आणि डीएड, बीएड अहर्ताधारकांची संख्या यांचे गुणोत्तर विषम आहे. त्यांच्यात स्पर्धा करून गुणवंत अणि दर्जेदार भावी शिक्षक निवडण्यासाठी यंदा प्रथमच टीईटी घेण्याचा निर्णय परीक्षा परिषदेने घेतला होता. परीक्षेत नेमके प्रश्न कोणत्या स्वरूपाचे असणार, याविषयी परीक्षार्थींमध्ये कमालीचा गोंधळ होता. यातच परीक्षा फारच कठीण असल्याच्या प्रतिक्रियादेखील व्यक्त झाल्या. काही तज्ज्ञांनी प्रश्नपत्रिकांमध्ये चुका असल्याचे परीक्षा परिषदेच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर असे तब्बल 38 प्रश्न रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सर्व प्रक्रियेमध्ये ज्यांचा काहीच दोष नाही, अशा परीक्षार्थींना कोणताही फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. टीईटी परीक्षांची घोषणा झाल्यानंतर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. या माध्यमातून त्यांच्या नोकरीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, या परीक्षेत झालेल्या गोंधळानेच परीक्षा गाजली.
मुद्रण प्रक्रियेमध्ये चूक झाल्याचा अंदाज
टीईटीचे रद्द झालेले 14 प्रश्न उर्दू प्रश्नपत्रिकेमधील आहेत. अन्य प्रश्नपत्रिकांतील रद्द प्रश्नांची संख्या लवकरच निश्चित होईल. ही चूक मुद्रण प्रक्रियेदरम्यान झाल्याचा अंदाज आहे. सहा विषयांचे 38 प्रश्न रद्द झालेत. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही. तूर्तास तरी प्रश्नपत्रिकेतील त्रुटींचा अभ्यास होत आहे. दिलीप सहस्रबुद्धे, अध्यक्ष, परीक्षा परिषद, सोलापूर.
चुकीच्या प्रश्नाचे गुण वजा होणार
प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढय़ा चुका समोर येतील, तेवढय़ा प्रश्नांचे गुण वजा करण्यात येतील. उर्वरित एकूण प्रश्नांपैकी पूर्वीप्रमाणेच 60 आणि 55 टक्के गुणांचा निकष कायम राहणार आहे. उदाहरणार्थ प्रश्नपत्रिकेमध्ये 10 प्रश्न रद्द झाले, तर 150 मधून 10 गुण वजा होतील. उरलेल्या 140 गुणांमधून 60 आणि 55 टक्केचा निकष लावण्यात येईल.