आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिक्षक संघटनेचे बेमुदत चक्री उपोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शिक्षक कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित प्रश्‍नांवर 15 ऑगस्टपासून बेमुदत चक्री उपोषण सुरू आहे. त्याला आता नऊ दिवस झाले आहेत. आतापर्यंत सरकारी अधिकार्‍यांनी दखल घेतली नसल्याची टीका संघटनेचे सरचिटणीस अंबादास शिंदे यांनी शुक्रवारी केली.


जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. संघटनेच्या 35 मागण्या आहेत. मोहन मोरे यांनी बेकायदा घेतलेले वेतन वसूल करून त्यांच्यावर पोलिस कारवाई करावी, कुसुम सदाशिव शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे वेतन अदा करावे, हनुमान विद्यालयातील (सुपली, ता. पंढरपूर) मुख्याध्यापक व शिक्षकांवर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदाखाली (अँट्रॉसिटी) गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे शाळेची मान्यता काढून घ्यावी, सामुदायिक कॉपी प्रकरणी पोलिसांच्या मागणीप्रमाणे शिक्षणाधिकरी यांनी गुन्हे दाखल करावेत, एल. एस. चंडक प्रशालेने (सोलापूर) न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वेतन अदा करावे, सोलापूर शहरातील मेहेर उर्दू विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक जावेद लालकोट यांचा समावेश करावा, बसवराज प्रशालेवर (करजगी, ता. अक्कलकोट) प्रशासक नेमावा आदी मागण्या असल्याचे शिंदे यांनी सांगितले.