आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक महाबळेश्वरात, विद्यार्थी घरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापू- महाबळेश्वर येथे होणार्‍या प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी साडेपाच हजार शिक्षकांनी सहा दिवस रजा काढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचा प्रन निर्माण झाला आहे. शिक्षकांच्या या अधिवेशनामुळे शाळांना अघोषित सुटीच जाहीर केल्याचे चित्र आहे. सोमवारी शिक्षकांअभावी जिल्ह्यातील अनेक शाळा बंद होत्या.

11 जानेवारीपर्यंत रजा

9 जानेवारी रोजी महाबळेश्वर येथे हे अधिवेशन होणार आहे. जिल्ह्यातील 11 हजार शिक्षकांपैकी साडेपाच हजार शिक्षक या अधिवेशनास गेले आहेत. जिल्ह्यात एकूण 2800 शाळा आहेत. त्या शाळांचा कारभार सोमवारपासून रामभरोसे चालणार आहे. महाबळेश्वर येथे होणार्‍या या अधिवेशनासाठी शिक्षकांनी सहा ते 11 जानेवारीपर्यंत रजा काढली आहे. राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या काही मान्यताप्राप्त संघटना आहेत. त्या संघटनांच्या अधिवेशनासाठी शासनाने शिक्षकांना जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अधिवेशनासाठी जाताना त्यांच्या हक्काच्या रजा खर्च कराव्यात, असे शासनाने सांगितले आहेत. शाळा चालवण्याची जबाबदारी गावातील डी.एड.धारक विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर गावातील सुशिक्षित तरुणांकडूनही शाळा चालवल्या जाणार आहेत. अधिवेशनासाठी एकाच शाळेतील सर्वच शिक्षक गेल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे सोमवारी अनेक शाळांना कुलूप होते. शिक्षण खात्यानेही पुरेसे नियोजन नव्हते.