आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्ञान देणा-या शिक्षकांच्या भेटीला धावला सन्मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- संस्कार,ज्ञान, व्यवहार आणि आत्मभान देणाऱ्या शिक्षकांच्या भेटीला सन्मानच जणू धावून गेला होता. शाळा, महाविद्यालयांमध्ये झालेल्या कार्यक्रमात हृद्य सत्कार सोहळे झाले. विद्यार्थ्यांच्या मनोगतांनी शिक्षकांना गलबलून आले. अशा भारावलेल्या वातावरणात शुक्रवारी शिक्षक दिन साजरा झाला. शहर सर्वत्र कार्यक्रम होते. शैक्षणिक संस्थांशिवाय सामाजिक आणि सेवाभावी संस्थांनी देखील या गुरुजनांचा सन्मान केला. शाळेतील अनुभव कथन केले.
कुचनप्रशाला
जिल्हासत्र न्यायाधीश अश्विनीकुमार देवरे यांच्या हस्ते कुचन प्रशालेत शिक्षकांचा सन्मान झाला. पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी अध्यक्षस्थानी होते. सचिव दशरथ गोप यांनी प्रास्ताविक केले. मार्कंडेय महामुनी आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात झाली. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीनिवास कटकूर, श्रीधर चिट्याल, दिनेश यन्नम, नागनाथ गंजी, मधुकर कट्टा आदी उपस्थित होते.
दयानंद महाविद्यालय
दयानंदकला शास्त्र महाविद्यालयात प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांचे व्याख्यान झाले. यावेळी स्नेहा चिलवेरी, स्वाती कमलाकर, प्रियंका कुंभार या विद्यार्थिनींनी या वेळी मनोगते व्यक्त केली. मंचावर प्राचार्य श्रीनिवास वडगबाळकर, उपप्राचार्य एस. पी. गायकवाड, पर्यवेक्षक प्रा. व्ही. के. बिराजदार, प्रा. आर. जी. मस्के, प्रा. डॉ. व्ही. पी. उबाळे, प्रा. पी. सी. भोसले आदी होते.