आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरुजींना पदोन्नतीसाठी द्यावी लागणार परीक्षा; शिक्षण हक्काच्या नव्या कायद्यामुळे करण्यात आले बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जिल्हा परिषद सेवेतील शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी अशा पद्धतीने पदोन्नती दिली जात असे. आता शासनाच्या नवीन आदेशानुसार व महाराष्ट्र शासनाने बालकाच्या मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियमानुसार पदाच्या विद्यमान आर्हता व नेमणुकीच्या पद्धतीमध्ये बदल केले आहेत. बदलेल्या पात्रतेनुसार शिक्षकांना पदोन्नती व परीक्षांद्वारे वरच्या पदावर जाण्याची संधी प्राप्त होणार आहे. शिक्षकांना स्वत:च्या गुणवत्ता व शैक्षणिक पात्रता वाढीस प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठतेच्या निकषाला पदोन्नती देताना मर्यादा येणार आहेत.
शिक्षकावर अन्याय
४राज्य घटनेने पदोन्नतीचा अधिकार दिला आहे. त्यामुळे हा निर्णय शिक्षकांवर अन्यायकारक आहे. पटपडताळणी नुसारआगोदरच हजारो शिक्षक अतिरिक्त ठरलेले असून नवीन कायद्यानुसार मंजूर पदांपैकी 50 टक्के पदे प्राथमिक जिल्हा परिषद सेवेच्याबाहेरील उमेदवारातून भरण्यात येणार असल्याने अतिरिक्त शिक्षकांच्या संख्येत वाढ होणार आहे. याबाबत आम्ही आक्षेप नोंदविणार आहेत.
रामचंद्र बिराजदार, सरचिटणीस , राज्य शिक्षक सभा
याप्रमाणे होतील पदोन्नतीच्या परीक्षा
1. विस्तार अधिकारी :
शिक्षण श्रेणी 2 व 3 वर्ग पदासाठी पात्रता 500 टक्के गुणासह मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी व बी.एड. पदवी, अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा तीन वर्षांचा अनुभव, वयोमर्यादा 36 वर्षे असून आर्हता असणार्‍यामधून 50 टक्के, जि.प., न.प प्राथमिक व माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्यामधून विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे 25 टक्के सेवाज्येष्ठतेने पदोन्नती परीक्षेद्वारे 25 टक्के पदे भरली जाणार आहेत. विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी 3 वर्ग हे पद आता रद्द करण्यात आले आहे.

2.केंद्रप्रमुख :
पदासाठी पात्रता 50 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व बी.एड. अध्यापनाचा तीन वर्षाचा अनुभव वयोमर्यादा 36 वर्षे असून ही अर्हता असणार्‍यांमधून सरळसेवाद्वारे 40 टक्के जि.प. मधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक ) यांच्यामधून विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे 30 टक्के सेवाज्येष्ठतेने पदोन्नती परीक्षाद्वारे 30 टक्के पदे भरलीजाणार आहेत. एकूण मंजूर पदांपैकी भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयासाठी पदाची विभागणी सम प्रमाणात करण्यात येणार आहे.
3. प्राथमिक शाळेतील
मुख्याध्यापक पदासाठी : पात्रता 50 टक्के गुणांसह मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी व बी.एड. 5 वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून अखंड सेवा वयोमर्यादा 33 वर्षे अशी असून सरळसेवाद्वारे 40 टक्के व जि.प.मधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदावर 5 वर्षे अखंड सेवा असणार्‍यामधून विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे 30 टक्के सेवाज्येष्ठतेने पदोन्नती परीक्षेद्वारे 30 टक्के पदे भरली जाणार आहेत.

4. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक
पदासाठी (प्राथमिक वर्ष 6 ते 8 )
पात्रता 50 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, बी.एड. वयोमर्यादा 33 वर्षे असून ही आर्हता असणार्‍यांमधून सरळसेवाद्वारे 40 टक्के व जि. मधील 3 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून अखंड सेवा असणार्‍यांमधून विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे 30 टक्के सेवाज्येष्ठता पदोन्नती परीक्षेद्वारे 30 टक्के पदे भरली जाणार आहेत. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (माध्यमिक वर्ग 9 ते 10 ) पदासाठी पात्रता 50 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, बी.एड. वयोमर्यादा 33 वर्षे .

50 % गुण आवश्यक
या सर्व पदोन्नती भरतीकरिता होणार्‍या स्पर्धा परीक्षेसाठी 50 टक्के गुणांची अट लागू राहणार आहे. त्यापेक्षा कमी गुण मिळविणार्‍या शिक्षकांना परीक्षेसाठी कायम मुकावे लागणार आहे. या निर्णयामुळे शिक्षकांवर अन्याय होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.