आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राथमिक शिक्षकांच्या होणार प्रशासकीय बदल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - शिक्षकांच्या 2011-12 या वर्षांमध्ये तालुकाबाह्य प्रशासकीय बदली झाल्या होत्या. आता त्यांच्या आपसात बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 11 नोव्हेंबर 2013 च्या शासन निर्णयानुसार केवळ प्राथमिक शिक्षकांचीच बदली प्रक्रिया सुरू असेल. पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांच्या बदल्या यातून वगळण्यात आल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी मदारगणी मुजावर यांनी दिली.

प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू होण्याच्या एक दिवस अगोदरच शासन निर्णय काढण्यात आला आहे. मात्र, या निर्णयानुसार इतर शिक्षकांवर अन्याय होणार आहे. त्याचबरोबर स्वत:चे गाव आणि मूळ शाळांमध्ये त्यांना बदली मिळणार नसल्याचेही शासनाने स्पष्ट केले आहे. 2008 ते 2010 या वर्षामध्ये तालुकाबाह्य प्रशासकीय बदली झालेल्या शिक्षकांनाही वगळण्यात आले आहे.

निर्णयानुसार प्रक्रिया
सरकारच्या निर्णयानुसार ही प्रक्रिया चालू आहे. पहिल्या दिवशी एकूण 900 च्यावर बदलीचे अर्ज आले. अर्ज स्वीकारणे बंद झाले आहे. त्यांच्या हरकती घेऊन येत्या 15 नोव्हेंबर रोजी बदली देण्यात येणार आहेत.’’ मदारगणी मुजावर, उपशिक्षणाधिकारी

शिक्षकांमध्ये भेदभाव
शासन व शिक्षण विभागाने शिक्षकांमध्ये भेदभाव केला आहे. प्रशासकीय बदल्या या सर्वाच्या घेणे आवश्यक असताना प्राथमिक शिक्षकांबरोबर पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांच्याही बदल्या होण अपेक्षित होते. त्यामुळे शिक्षक सभेच्या वतीने निर्णयाचा निषेध करतो. येत्या दोन- तीन दिवसांत तीव्र आंदोलन करण्यात येईल.’’ रामचंद्र बिराजदार, जिल्हा सरचिटणीस, शिक्षक सभा