आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

346 शिक्षकांच्या बदल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - 2011 व 2012 या वर्षामध्ये तालुकाबाह्य प्रशासकीय बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदलीची प्रक्रिया शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात पार पडली. यामध्ये एकूण 346 शिक्षकांच्या आपसी बदल्या झाल्या. 58 शिक्षकांनी मूळ गाव आणि स्व-ग्राम टाकून अर्ज केल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले, अशी माहिती उपशिक्षणाधिकारी मदारगणी मुजावर यांनी दिली.

11 नोव्हेंबर 2013 च्या शासन निर्णयानुसार केवळ प्राथमिक शिक्षकांचीच बदली प्रक्रिया शुक्रवारी झाली. एकूण 938 प्राथमिक शिक्षकांनी बदल्यासाठी अर्ज केले होते. यामध्ये 412 जण पात्र ठरली आणि त्यापैकी 58 जणांनी स्व-ग्राम आणि मूळ गाव अजब केल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. 2008 ते 2010 या वर्षामध्ये तालुकाबाह्य प्रशासकीय बदली झालेल्या शिक्षकांनाही वगळण्यात आले आहे. पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांच्या बदल्या मात्र या शासननिर्णयानुसार वगळल्या. बदली प्रक्रियांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, अधीक्षक इरण्णा खोरे यांनी काम पाहिले.

पुढील शासन निर्णयात सोय
938 पैकी ज्या शिक्षकांच्या आपसात बदल्या झाल्या नाहीत, त्यांना मूळ तालुक्यात येण्यासाठी सोयीची जोडी मिळालेली नाही. अशा शिक्षकांसाठी एप्रिल 2014 च्या शासन निर्णयामध्ये सोय करून घेण्यासाठी राज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरूटे, सरचिटणीस केशव जाधव यांनी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून शिक्षकांची मूळ तालुक्यात सोय करू , असे आश्वासन दिले.

शिक्षक संघाचा आंदोलनाचा इशारा
शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यादीतील पात्र शिक्षकांबरोबर जोडी लावण्याची विनंती केली. मात्र त्यांनी त्यास नकार दिला. म्हणून अशा शिक्षकांवर अन्याय झालेला. प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा शिक्षक संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.’’ जोतीराम बांगे, कार्याध्यक्ष, जिल्हा शिक्षक संघ

अकार्यक्षम अधिकारी
प्रशासकीय बदल्या करण्यास सीईओ, उपशिक्षणाधिकारी हे अकार्यक्षम आहेत. शिक्षकांच्या सोईनुसार बदल्या केल्या तर उद्देश सफल होईल. मात्र सीईओ तुकाराम कासार आणि मुजावर यांना विनंती केली तरी त्यांनी मान्य केली नाही. त्यामुळे शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे या प्रशासकीय बदल्याच्या संघटनेतर्फे निषेध करतो. ’’ श्यामराव जवंजाळ, अध्यक्ष, मागासवर्गीय शिक्षक संघटना