आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम थर्टी - विधानसभेची जबाबदारी ११ निवडणूक तर १८ नोडल अधिकाऱ्यांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विधानसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली २९ अधिकाऱ्यांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यात ११ निवडणूक आणि १८ नोडल अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ११ मतदारसंघांसाठी अकरा उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील. मतदारसंघात प्रत्येकी निवडणूक अधिकारी साहाय्यक निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदारांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
नोडल अधिकारी असे
अन्नधान्यवितरण अधिकारी (मनुष्यबळ निवडणूक साहित्य)
महसूल उपजिल्हाधिकारी (प्रशिक्षण आदी)
निवासी उपजिल्हाधिकारी (आचारसंहिता)
अपर जिल्हा पोलिस अधीक्षक (कायदा सुव्यवस्था, सुरक्षा)
भूसंपादन अधिकारी (मतदान यंत्र)
मुद्रांक जिल्हाधिकारी (जनजागृती)
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (वाहतूक)
जिल्हा परिषद अभियंता (निरीक्षक)
सोलापूर विद्यापीठाचे लेखाधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त लेखाधिकारी (निवडणूक खर्च)
नगरविकास प्रशासन अधिकारी (नियंत्रण)
नियोजन अधिकारी (निवडणुकीचे तपशील)
महसूल तहसीलदार (मदत केंद्र)