आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनरक्षक प्रणालीचा अभ्यास करणे गरजेचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अपघात किंवा हृदयविकारचा झटका आल्यास पहिले तीन मिनिटे महत्त्वाची असतात. त्यामुळे आजच्या प्रगत स्त्रीरोग शस्त्रक्रिया, तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे. सर्वांनी याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रगत तंत्रज्ञानाद्वारे जीवनदान मिळू शकते, असे मत डॉ. एन. के. चंडक यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

स्त्रीरोग संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), खासगी रुग्णालय यांच्या वतीने आयएमए हॉल येथे जीवनसुरक्षा प्रणाली या विषयावर कार्यशाळा झाली. तिचे उद्घाटक म्हणून डाॅ. चंडक बोलत होते. डॉ. चंडक म्हणाले की, प्रत्येक रुग्णालयात जीवनरक्षक प्रणाली असते. मात्र त्याचा उपयोग समाजातील प्रत्येक घटकाला व्हावा, यासाठी जीवनरक्षक निर्माण करावे. त्यासाठी योग्य व तांत्रिक प्रशिक्षण द्यावे . यासाठी अशा कार्यशाळेचे आयोजन करण्याची गरज आहे.

स्त्रियांच्या मूत्रमार्गातील इजा व त्यावरील उपचार यावर डॉ. नागराज (बंगळुरू) बोलले. परिचारिकांना डॉ. नागेंद्र सरदेशपांडे, श्रीधर खजवदिार, डॉ. कुंदन इंगळे, डॉ. आशुतोष ठोळे, अनलि मकदूम, स्मिता जोशी, जयंती आडके, डॉ. नितीन पाटणकर, डॉ. वामन घोडके यांनी प्रशिक्षण दिले.

यावेळी आयएमएचे अध्यक्ष गिरीष कुमठेकर, डॉ. हरिष राचूरकर, डॉ. मंजुषा शहा, डॉ. भारती तडवळकर आदी उपस्थित होते. सुमारे २५० जणांनी सहभाग घेतला होता.
प्रत्यक्षिकासह मार्गदर्शन
अपघात किंवा इतर आजारामध्ये पहिले तीन मविटि खूप आवश्यक असते. त्यासाठी त्यांना प्राथमिक उपचार देणे आवश्यक आहेत. हृदय बंद पडल्यास ते सुरुवात करणे आवश्यक आहे. त्यासाठी छातीवर दाब देणे, फुफुसाचे कार्य पुन्हा चालू करण्यासाठी दाब देवून पुन्हा श्वास चालू करणे याची प्रात्याक्षिके डॉ. मंजूषा शहा यांनी दाखवले .