आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक व्हा, अडचणी सोडवून घ्या; तेलुगु समाज अध्यक्षांनी दिली हाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर शहरात तेलुगु भाषा बोलणारे 24 समाज घटक आहेत. तेलंगण आणि कर्नाटकातून आलेली ही मंडळी उपजीविकेसाठी सोलापुरात स्थिरावली. आपापल्या व्यवसायातील कौशल्याने पुढे आली. त्यांच्या समोर शैक्षणिक आणि आर्थिक समस्या आहेत. त्या सोडवून घेण्यासाठी सर्व घटक एक झाला पाहिजे, असा सूर गुरुवारी झालेल्या तेलुगु संगममध्ये उमटला.

पद्मसेना प्रतिष्ठानच्या वतीने पूर्व विभाग वाचनालयात हा कार्यक्रम झाला. त्यासाठी सर्व तेलुगु समाज घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तेलुगु भाषादिननिमित्त त्याचे आयोजन केल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष र्शीनिवास दिड्डी यांनी सांगितले. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष जनार्दन कारमपुरी, तोगटवीर समाजाचे अध्यक्ष वसंतराव उदगिरी, आदी जांबमुनी मोची समाजाचे अध्यक्ष बसवराज म्हेत्रे, मद्विरशैव कुरुहिनशेट्टी समाज अध्यक्ष राजू कामूर्ती, नीलकंठ समाजाचे कृष्णाहरी चिंता, नीलगार समाजाचे मल्लिकार्जुन चिंताकिंदी आदी या वेळी उपस्थित होते.

तेलुगु भाषकांना जातीच्या विविध वर्गवारीत समाविष्ट करण्यात आले. टकारी व वडार समाज भटक्या विमुक्तमध्ये आहे, तर पद्मशाली विशेष मागास प्रवर्गात आहे. त्यामुळे जातीचे दाखले मिळवण्यात अडचणी येतात. त्या सोडवण्यासाठी तेलुगु भाषकांचे नेतृत्व असावे. त्याने सर्व समाज घटकांना विश्वास देऊन प्रश्न सोडवावेत, असे मुन्नरवारलू ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष संजय उपलप म्हणाले. पद्मसेना प्रतिष्ठानचे सल्लागार प्रा. व्यंकटेश पडाल यांनी आभार मानले.