आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ten Lakh And Thirty Thousand LBT Collected Witihin A Day

एका दिवसात साडेदहा लाख ‘एलबीटी’ जमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेकडे शनिवारी साडेदहा लाख रुपयांचा स्थानिक संस्था कर (एलबीटी) जमा झाला. इलेक्ट्राॅनिक्स उपकरण विकणाऱ्या १५ विक्रेत्यांनी २१ धनादेश आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांना सुपूर्द केले. विशेष म्हणजे, शनिवारी सरकारी सुटी होती.
आयुक्तांनी व्यापाऱ्यांना कर भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर कारवाई आणि व्याज, दंडासह रक्कम वसूल करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याची कल्पना आयुक्तांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली होती. येत्या ऑगस्टपासून ‘एलबीटी’ बंद करण्यात आली आहे. थकीत रकमेवरील व्याज आणि दंडही माफ करण्याची घोषणा केली होती. मात्र, थकीत ‘एलबीटी’ची पूर्ण रक्कम व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याची सूचना फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार कराची रक्कम भरण्यासाठी महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना आवाहन केले होते. चेंबर्स ऑफ कॉमर्सनेही कर भरण्याचे आवाहन केले होते. मात्र, प्रत्यक्षात व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद शून्य होता. त्यामुळे दोन दिवसांची मुदत आयुक्तांनी दिली. त्या काळात थकीत रक्कम भरल्यास कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. तसेच थकीत रक्कम दंड आणि व्याजासह वसूल करणार असल्याचेही त्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले होते.

कार्यालय रविवारी सुरू
महापालिकेकडूनस्थानिक संस्था कर (एलबीटी) वसुलीची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यापूर्वी व्यापाऱ्यांना एलबीटी भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली. त्यामुळे त्यांना एलबीटी भरता यावी म्हणून महापालिकेतील एलबीटी विभाग रविवारी काही काळ सुरू राहणार आहे. शनिवारी मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील महापालिकेत आले हाेते. रविवारी सुटीदिवशी मी महापालिकेत राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.