आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्ती विटंबनेनंतर सोलापुरात तणाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - कुंभारी येथील गोदुताई विडी घरकुल परिसरातील देवीच्या मूर्तीची विटंबना झाल्याचे उघडकीस आले. हा प्रकार कळताच गुरुवारी सकाळी जमावाने मुख्य चौकात घोषणाबाजी करत बाजारपेठ बंद केली. दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जमाव नियंत्रणात आणला.

विडी घरकुलमधील एका खोलीत अनेक दिवसांपासून देवीच्या मूर्तीची पूजा केली जात होती. बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या खोलीतून धूर निघत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच मोठा जमाव जमला. आरोपींच्या अटकेची मागणी करीत घोषणाबाजी करण्यात आली. दोषींना आठ दिवसांत अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर प्रकरण शांत झाले. या प्रकरणी बुधवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर गुरुवारी सकाळी जमावाने हॉटेल आणि दुकाने बंद केली. यानंतर पोलिस घटनास्थळी आले आणि त्या जमावाला पांगवले तसेच १८ जणांना ताब्यात घेतले. माजी आमदार नरसय्या आडम यांनीही सर्वांना शांततेचे आवाहन केले. अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, सहायक जिल्हा अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, पोलिस उपअधीक्षक मनीषा दुबूले, आदींसह मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता.