आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशमूर्ती विटंबनामुळे सांगोल्यात तणाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगोला ; एका सार्वजनिक गणेश मंडळातील गणेश मूर्तीची विटंबना झाल्याचा प्रकार सांगोला (जि. सोलापूर) येथे बुधवारी पहाटे उघडकीस आला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. व्यापार्‍यांनीही बाजारपेठा बंद ठेवल्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून संताप व्यक्त केला. आरोपीला तातडीने न पकडल्यास विसर्जन करणार नाही, असा इशारा गणेश मंडळांनी दिला.

कोष्टी गल्लीत लंबोदर मंडळाची पाच फूट उंचीची मूर्ती आहे. रात्री अडीच वाजेपर्यंत येथे कार्यकर्ते होते. नंतर सागर म्हेत्रे या एकटाच मंडपातच झोपला होता. पहाटेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गणेशमूर्तीचा काही भाग तोडला. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर दंगाविरोधी पथकासह पोलिसांची मोठी कुमूक शहरात मागवण्यात आली. पण तोपर्यंत शहरात ही वार्ता सगळीकडे समजली आणि तणाव निर्माण झाला. अनेक मंडळांचे कार्यकर्ते घटनास्थळी येत होते. घटनेचे गांभीर्य ओळखून सकाळी आठच्या सुमारास पोलिसांच्या उपस्थितीत गणेश मूर्ती पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, या प्रकारानंतर शहरातील सर्वच गणेश मंडळांसमोर बंदोबस्तासाठी होमगार्ड तैनात करण्याचे आश्वासन पोलिस अधिकार्‍यांनी दिले.